घरताज्या घडामोडीVideo : सारा अली खान बनली 'जलपरी'

Video : सारा अली खान बनली ‘जलपरी’

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओतून साराने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. बॉलिवूडमध्ये अगदी अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चागंलीच चर्चेत आली आहे. सध्या सारा खान मालदिव्जमध्ये आपला भाऊ इब्राहिम अली खान आणि तिची आई अमृता सिंह यांच्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यामुळे सारा अली खान सातत्याने स्वत: चे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. नुकतेच साराने फोटोनंतर दोन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून या व्हिडिओमध्ये सारा स्विमिंग करताना दिसत आहे.

- Advertisement -

सारा अली खानने सोशल मीडियावर स्विमिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला साराच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये साराने व्हाइट रंगाची बिकीनी घातली असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी लाइक्स करत कमेंट्स देखील केल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शन देखील दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते की, स्वर्गाचा कोणता रंग असेल तर तो हा आहे.

- Advertisement -

तसेच या व्हिडिओसोबत साराने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये सारा शिपवरुन उडी घेऊन समुद्राच्या आता जाताना दिसत आहे. समुद्राच्या आत जाऊन ती जलपरी होऊन आनंद घेत आहे. तसेच तिने या व्हिडिओसोबत ‘मी जलपरी’, असे देखील म्हटले आहे.


हेही वाचा – ‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून टायगर श्रॉफची झाली ‘ही’ अवस्था


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -