घरताज्या घडामोडीदुरांतो - राजधानी एक्स्प्रेसचे टीसी झाले स्मार्ट

दुरांतो – राजधानी एक्स्प्रेसचे टीसी झाले स्मार्ट

Subscribe

भारतीय रेल्वेच्या प्रीमिअम रेल्वे गाड्यांमध्ये काळा कोट आणि पांढरा शर्ट, पँट असा पांरपरिक गणवेशात असलेले टीसी आता इतिहास जमा होणार आहेत. त्याजागी आता आधुनिक टच दिलेले ‘स्मार्ट’ गणवेशात टीसी दिसणार आहेत. याची सुरुवात मध्य रेल्वेने केली असून नवा गणवेश मध्य रेल्वेचा दुरांतो आणि राजधानी एक्स्प्रेसच्या टीसींना दिला आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या या दोन प्रीमिअम गाड्यातील टीसींचा लूक चेंज झाला आहे.

देशातील रेल्वेच्या प्रीमिअम गाड्यांमधील कर्मचार्‍यांना वेगळा गणेवश असला पाहिजे, असे रेल्वे बोर्डाने ठरविले होते. त्यानूसार देशातील प्रीमिअम गाड्यांमधील गणवेश लागू होणार आहे. मात्र सर्व प्रथम मध्य रेल्वेने या नव्या गणवेशांची अमंलबजावणी सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या दुरांतो आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन प्रीमिअम गाड्या आहे. त्यामुळे या गाडीतीली टीसींचा गणवेश बदलला आहे. ज्यामध्ये पांरपरिक ड्रेस कोडमध्ये बदल करुन त्यांना आकर्षक असा सुट देण्यात आला आहे. हा गणवेश बनविताना रेल्वे प्रशासनाने बराच अभ्यास केला. त्यानंतर हा नवा गणवेश बनविण्यात आला आहे. या गणवेशाला आधुनिक टच देण्यात आला असून त्यामुळे टीसी स्मार्ट दिसत आहेत. मध्य रेल्वेचा नागपूर विभागात दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २४ कर्मचारी कार्यरत आहेत. तर राजधानी एक्स्प्रेसमध्ये सुध्दा साधारणातः ३० कर्मचारी आहेत. या सर्वांनाच हा नवा ड्रेस कोड लागू झाला आहे.

- Advertisement -

असा आहे नवा गणवेश

नव्या ड्रेस कोडनुसार या कर्मचार्‍यांना पांढरा शर्ट, त्यावर लाल रंगाचा टाय आणि करड्या रंगाचा सुट निर्धारित केला आहे. गाडी अधीक्षकाच्या कोटाच्या बाहीवर सोनेरी रंगाच्या तीन, तर उपअधीक्षकाच्या बाहीवर दोन पट्ट्या असतील. तसेच कोटावर भारतीय रेल्वेचे चिन्ह देखील असणार आहे.

प्रीमिअम गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना आपण काही तरी खास गाडीने प्रवास करतोय असा अनुभव आला पाहिजे, या उद्देशाने गणवेशात काही बदल करण्यात आले आहे. टीसींचा हा नवा गणवेश अभिमानास्पद आहे, या गणवेशामुळे टीसी आकर्षक आणि स्मार्ट दिसत आहेत. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -