घरताज्या घडामोडीधक्कादायक! विवाहित महिलेला प्रियकरासोबत 'या' अवस्थेत पाहिले आणि...

धक्कादायक! विवाहित महिलेला प्रियकरासोबत ‘या’ अवस्थेत पाहिले आणि…

Subscribe

विवाहित महिलेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने कुटुंबियाने रागाच्या भरात केले भलतेच कृत्य.

लग्नानंतर प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या विवाहित महिलेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबियांनी धक्कादायक पाऊल उचल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अयोध्या पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

नेमके काय केले?

अयोध्यातील पिपरा गावातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेचे लग्नानंतरही तिच्या प्रियकरासोबत संबंध होते. लग्नानंतर हे दोघेही एकमेकांना लपूनछपून भेटत होते. महिलेच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी महिलेवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी नेहमीप्रमाणे प्रियकर महिलेला भेटण्यसाठी आला होता. त्यावेळी या दोघांनाही कुटुंबियाने नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. त्यानंतर कुटुंबियाने रागाच्या भरात या दोघांनाही गावकऱ्यांसमोर उभे केले आणि त्या दोघांचे हात दोरीने बांधले. नंतर महिलेच्या कुटुंबियाने महिलेला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि रागाच्या भरात दोघांचे नाकच कापून टाकले.

- Advertisement -

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही सीएचसी रुदौली रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘निर्भयाची पुनरावृत्ती’; गुप्तांगात रॉड घालून केला हत्येचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -