घरताज्या घडामोडीमनसेच्या मोर्चाचा मार्ग बदलला, मनसेनं फोडलं शिवसेनेवर खापर

मनसेच्या मोर्चाचा मार्ग बदलला, मनसेनं फोडलं शिवसेनेवर खापर

Subscribe

मोर्चाच्या मार्गात बदल झाल्याचे सांगण्यात येत असले तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेचा अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. या मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र मनसेने आपल्या मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान अशी मागितलेली परवानगी अखेर पोलिसांनी नाकारली असून, त्याऐवजी मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्याची सूचना पोलिसांनी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाचा मार्ग आता गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा निघणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत गृहमंत्री अनिल देखमुख यांना विचारले असता त्यांनी मनसेने मोर्चासाठी अद्याप कोणताही विनंती अर्ज केला नसल्याचे सांगत जर तसा परवानगीचा अर्ज आल्यास योग्य ती दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मनसेने जिजामाता ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मार्गाला परवानगी नाकारण्यात आली. तसेच सुरुवातीला मनसेने ज्या मार्गावर परवानगी मागितली होती, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहत असून, जर या भागातून मोर्चा निघाला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते यामुळे पोलिसांनी मनसेला या मार्गाची परवानगी देण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

शिवसेना मोर्चाला घाबरली

दरम्यान पोलिसांनी नाकारलेल्या परवानगीवर मनसेने शिवसेनेला जबाबदार धरले असून, हा मोर्चा होऊ नये असे शिवसेनेला वाटत असल्याची टीका मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली. तसचे भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा निघावा असा आमच्या कार्यकर्त्यांचा रेटा होता. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुवस्थेच्या दृष्टीने मार्ग बदला असे सांगितले. त्यामुळे आम्ही देखील कायदा आणि सुव्यवस्था मानणारी लोके आहोत त्यामुळे आम्ही पोलिसांचे एकले आणि आमचा मोर्चा आता नव्या मार्गाने काढणार असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. एवढेच नाही तर या मागे कोणते राजकारण तर नाही ना अशी शंका देखील येत असल्याचे सांगत, जेव्हा राज ठाकरेंनी २३ तारीखला हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली तेव्हा खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौरा काढू असे म्हटले. या सर्व गोष्टी पाहता शिवसेनेलाच हा मोर्चा होऊ नये, असे वाटत असल्याचे यशंवत किल्लेदार म्हणालेत.

 

- Advertisement -

मोर्चासाठी मनसेचे नवे पोस्टर

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, या मोर्चाची जबाबदारी मनसेने सर्व विभाग अध्यक्षांवर दिलेली आहे. एवढेच नाही तर मनसेने या मोर्चासाठी आपले नवे पोस्टर देखील जाहीर केले असून, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतु पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. त्यांना आपल्या देशातून हाकललेच पाहिजे, असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच येत्या ९ फेब्रुवारीला मोठ्या संख्येने सामिल व्हा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान मनसेच्या या महामोर्चाला हिंदू संघटनांनी देखील पाठिंबा दिला असून, या मोर्चाला मोठ्या संख्येने हिंदू संघटना उपस्थित राहणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -