घरताज्या घडामोडीशिवसेनेला मोठा धक्का; सेनेचे बडे नेते मनसेत प्रवेश करणार

शिवसेनेला मोठा धक्का; सेनेचे बडे नेते मनसेत प्रवेश करणार

Subscribe

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा निघणार आहे. याआधी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन, प्रकाश कौटगे, सुहास दशरथे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. हे शिवसेनेचे नेते आज मनसेत करणार असल्याचं समोर येतं आहे.तब्बल ३८ वर्षापासून कट्टर शिवसैनिक असलेले औरंगबादचे नेते सुहास दशरथे आज मनसेत प्रवेश करणार आहेत. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे समर्थक म्हणून सुहास दशरथे यांची ओळख होती.

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांना २००९ ला मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. पण शिवसेनेलाही त्यांनी २०११ मध्ये राम राम केला असून ते पुन्हा एकदा मनसेत प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

असा निघणार मोर्चा

उद्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा मनसेचा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने नवा मार्ग निवडण्यात आला आहे.

पाहा मनसेच्या महामोर्चाचा टीझर 

- Advertisement -

…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा

…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा

MNS Adhikrut ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020


हेही वाचा – मुंबईकरांनो आज नाइट लाइफ बंद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -