घरताज्या घडामोडीपोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

Subscribe

नाशिकमधील धक्कादायक घटना, कौटुंबिक वादाचे कारण

कौटुंबिक वादातून पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलेल्या महिलेचा मंगळवारी (दि.११) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. समजूत घालूनही मुलगी आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेल्याच्या रागातून ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हरविंदरसिंग अमरीतसिंग संधू (५५, रा. टकलेनगर, पंचवटी) असे पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

आमनप्रित संधू (27) हिचा कुटुंबियांनी मनाविरुद्ध राजविंदर पड्डा (रायपूर, छत्तीसगड) याच्याशी 18 जानेवारीला विवाह लावून दिला. तथापि, पतीने शिवीगाळ व मारहाण केल्याने आमनप्रित सात दिवसांत नाशिकला मैत्रिणीकडे राहण्यास आली. दरम्यान, सासरच्या मंडळींनी रायपूर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. यानंतर संबंधित विवाहिता नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला बोलावून घेत समजूत काढली. मात्र, तिने सासरी जाण्यास नकार दिला व आई-वडिलांकडे राहण्यासही नकार दिला. अखेर तिने यासंदर्भात आई-वडिलांसह नातेवाईकांच्या समक्ष आपला जबाब लिहून दिला. मुलीच्या या निर्णयामुळे तणावात आलेल्या तिच्या आईने बदनामीच्या भितीपोटी सोमवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दाराजवळच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान, मंगळवारी पहाटे 5.30 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -