घरताज्या घडामोडीसुनावणी दरम्यान निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

सुनावणी दरम्यान निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

Subscribe

निर्भयाच्या आईने आपले दोन्ही हात जोडत न्यायाधीशांना विनंती केली'.

कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषीं विरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी निर्भयाच्या आईने न्यायालयासमोर केली आहे. ‘मागील सात वर्षांपासून न्यायासाठी आपण खेपा घालत आहोत, यावेळेस तरी आरोपींना लवकरात लवकर फासावर चढवा’, असे म्हणत निर्भयाच्या आईने आपले दोन्ही हात जोडत न्यायाधीशांना विनंती केली.

दोषी पवन गुप्ता याला सरकारी वकील

याप्रकरणी तिहाड जेलमध्ये डेथ वॉरेंट जारी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. आरोपींना वकील देणे हा अन्याय असल्याचे निर्भयाच्या वडिलांनी यावेळेस सांगितले आहे. मात्र नियमानुसार आरोपीला वकील देणे गरजेचे असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. याप्रकरणी दोषी पवन गुप्ता याला सरकारी वकील देणार असल्याचे न्यायाधीशांनी दोषी पवन गुप्ताच्या वडिलांना सांगितले. दोषीं विरोधात लवकर डेथ वॉरेंट जारी केले जावे यासाठी दिल्ली सरकारने आणि निर्भयाच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली. ‘अनेक वेळा न्यायालयात खेपा घालून देखील न्याय मिळत नाही. दोषींची बाजू ऐकली जाते मात्र आमची नाही’, असे म्हणत निर्भयाच्या आईने न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडली. मात्र तुमच्या प्रत्येक म्हणण्याची दखल न्यायालय घेत आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.

- Advertisement -

गुरुवारपर्यंत सुनावणी पुढे

निर्भयाच्या आईची बाजू मांडणाऱ्या वकील सीमा कुशवाह यांनी सांगितले की, याप्रकरणी आतापर्यंत कोणत्याही दोषीची कोणतीही याचिका प्रलंबित नाही आहे. त्यामुळे न्यायालयाद्वारे दोषीं विरोधात नवे डेथ वॉरेंट जारी करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान न्यायाधीशांनी गुरुवारपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -