घरट्रेंडिंगएका तिकिटाने आयुष्य बदलले; केरळमधील मजूर एका रात्रीत झाला करोडपती

एका तिकिटाने आयुष्य बदलले; केरळमधील मजूर एका रात्रीत झाला करोडपती

Subscribe

एका मजूराचे नशीब फळले, एका रात्रीत झाला कोट्यधीश...

“देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के…” हेराफेरीमधील हे प्रसिद्ध गाणं तुम्ही ऐकलंच असेल. असाच एक प्रत्यय आला आहे केरळमधील एका गरीब मजुराला. दररोज मजूरी करुन आपलं पोट भरणारे केरळमधील पी. राजन अगदी कालपर्यंत एक सामान्य मजूर होते. पण आज ते कोट्यधीश झाले आहेत. ख्रिसमस न्यू ईयर लॉटरीमध्ये त्यांनी चक्क १२ कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे.

केरळच्या कुथुपरंबा (Kuthuparamba) येथील पी. राजन हे दररोज मजुरी करून आपलं घर चालवत होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी बँकेकडून तीन वेळा कर्ज घेतले होते. अगोदरच्या कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांना चौथ्यांदा बँकेने कर्जही नाकारले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी पी. राजन हे नेहमी लॉटरीचे तिकीट विकत घेत असत. यावरून अनेकदा त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रंजना सोबत वाद होत होते. परंतु १२ फेब्रुवारी रोजी लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि तिकीट क्रमांक ST 269609 पहिले बक्षीस म्हणजेच १२ कोटी हे पी. राजन यांना मिळाल्याचे जाहीर झाले.

- Advertisement -
हे वाचा – पंक्चरचे दुकान ते राजधानी दिल्लीत आमदार; ‘आप’चा मराठी चेहरा

सुरुवातीला पी. राजन यांना स्वतःलाही विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेकदा तिकीट वारंवार तपासून पाहिले. त्यानंतर त्यांना खात्री झाली की आपणच १२ कोटी जिंकलेलो आहोत. त्यांच्या पत्नीला ही बातमी सांगितल्यानंतर रंजना यांना थट्टा-मस्करी वाटली. पण जेव्हा आजूबाजूचे लोक अभिनंदन करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनाही याची खात्री पटली.

हे वाचा – मनसेचा नवा झेंडा वादात, निवडणूक आयोगाने बजाविली नोटीस

नियमानुसार बक्षिसाच्या रकमेतून कर वजा करून पी. राजन यांना जवळपास ८ कोटी रुपये मिळणार आहेत. एवढ्या रकमेचे काय करणार? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रथम माझ्यावरील बँकेचे थकीत कर्ज आणि इतर कर्ज फेडणार. त्यानंतर माझ्या अर्धवट राहिलेल्या घराचे बांधकाम पूर्ण करणार. पुढे ते म्हणाले की, मी गरिबीत जन्मलो आणि जगलो. त्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे. त्यामुळे गरिबांसाठी काम करण्याची मला इच्छा आहे. एकूणच ३०० रुपयांच्या तिकिटाने एका अतिसामान्य मजुराचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले, हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -