घरमुंबईलांब पल्ल्याच्या एसी डब्यात नाक दाबून प्रवास

लांब पल्ल्याच्या एसी डब्यात नाक दाबून प्रवास

Subscribe

एसी कोच अटेंडन्स यांच्या काम बंद आंदोलनाचा रेल्वे प्रवाशाला फटका

800 एसी कोच अटेंडन्स कामगारांनी गेल्या 15 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना मंगळवारी नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागला. प्रवाशांकडून गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या ट्विटर अंकाऊंटवर अस्वच्छतेबाबत पोस्ट करून अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र तरी सुध्दा प्रवाशांचा समस्याचे निराकरण झाले नाही. रेल्वे कंत्राटदार आणि एसी कोच अटेंडन्स यांच्या वादामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना फटका बसत आहे.

रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यातील वातानुकूलित डब्यात प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी एसी कोच अटेंडन्स नियुक्त करण्यात आले होते. या कोच अटेंडन्सकडून प्रवाशांना बेड रोल पुरविने सोबत डब्यातील प्रवाशांची काळजीसह इतरही काम करत असायचे. मात्र आता यांच्यावर रेल्वे डब्यातील शौचालयाची स्वच्छता करण्याची जबाबदारी सुध्दा टाकण्यात आली आहे. मध्य रेल्वेने नूकतेच नविन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोच आणि शौचालयाची जबाबदारी एसी कोच अटेंडन्सकडे देण्यात आली आहे.त्यामुळे कोच अटेंडन्सकडून यांचा विरोध करत गेल्या 15 दिवसापासून एलटीटीवर काम बंद आंदोलन सुरु केले आहे. इतकेच नव्हेतर या कामाचा विरोध करण्यार्‍या कामगारांना कामावरुन काढण्यात सुध्दा आले आहे. त्यामुळे कोच अटेंडन्सकडून कंत्राटदारविरोधात काम बंद आंदोलन सुरु केले असून याचा फटका प्रवाशांना मोठया प्रमाणात बसत आहे.

- Advertisement -

प्रवाशांचा काय दोष
रेल्वे प्रवासी नेहमीच रेल्वे डब्यात काही समस्या आल्या की, रेल्वेचा ट्टिवटर पोस्ट करत समस्या माडत असतात. त्याला रेल्वेकडून सुध्दा तत्काळ प्रतिसाद मिळतो. मात्र गेल्या काही दिवसापासून एसी कोच मध्ये अस्वच्छते बाबत तक्रारी मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेची सुध्दा डोके दुखी वाढली आहे. कंत्राटदार आणि एसी एसी कोच अटेंडन्स वादामुळे सर्वसामान्य प्रवासी भरडला जातो आहे. रेल्वेनी यावर लवकरात लवकर तोडगा काढवा अशी प्रवाशांची मागणी आहे.

एसी कोच अटेंडन्सचा समस्या घेउुन गेल्या काही दिवसापासून आमचे आंदोलन सुरु आहे. बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी भेट होणार आहे.त्यात जर समस्याचे निराकरण झाले नाही तर येणार्‍या काळात आम्ही उपोषन करु
– अमित भटनागर, उपाध्यक्ष, सेट्रल रेल्वे मंजदूर संघ

- Advertisement -

सर्व काम रेल्वे बोर्डच्या गाईड लाईन प्रमाणे होत आहे. आतापर्यंत झालेल्या कंत्राटा मध्ये अशा प्रकारच्या तक्रारी नाही.
-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -