घरदेश-विदेश...उसको भेजो कब्रस्तान; पोस्टरने पुण्यात खळबळ

…उसको भेजो कब्रस्तान; पोस्टरने पुण्यात खळबळ

Subscribe

'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,' अशा आशयाचा पोस्टर झळकल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या पोस्टरमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,’ अशा आशयाचा पोस्टर झळकल्याने खळबळ माजली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि एनपीआर विरोधात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरुमध्ये रॅली काढण्यात आली होती. यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत अमूल्या नावाच्या मुलीने ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. तिचा घोषणा देतानाचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.


हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी सुनावली अजब शिक्षा..अजितदादांनी मागितली माफी!

- Advertisement -

दरम्यान, ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या प्रकरणी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत तिला न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,’ अशा आशयाचा पोस्टर झळकल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या पोस्टरमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

ट्वीटरवर निखील पवार यांनी हे पोस्टर ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी, “मेट्रो शहरात उघड उघड असे कब्रस्ताननात धाडण्याचे बॅनर लागायला आपलं काय तालिबानी राज्य आहे का? असा सवाल करत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधले आहे. पुण्याच्या एसपी कॉलेजच्या चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -