घरताज्या घडामोडीकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १५ मार्चपासून निर्यातबंदी उठणार!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १५ मार्चपासून निर्यातबंदी उठणार!

Subscribe

कांद्यावरची निर्यातबंदी अखेर केंद्र सरकारने उठवण्याचा निर्णय घेतला असून येत्या १५ मार्चपासून कांद्याची निर्यात करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

राज्यासह देशभरातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी उठवण्याची केलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून येत्या १५ मार्चपासून कांदा निर्यातबंदीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून कांद्याच्या निर्यातीसाठी १५ मार्चपासून परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे’, असं पियुष गोयल यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नाशिकच्या लासलगावमध्ये या मुद्द्यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. भाव पडल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलावच बंद पाडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -