घरदेश-विदेशनिर्भयाच्या दोषींना नवीन तारीख २० मार्चला पहाटे ५.३० वा. फाशी

निर्भयाच्या दोषींना नवीन तारीख २० मार्चला पहाटे ५.३० वा. फाशी

Subscribe

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. बुधवारी दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यामुळे चारही दोषींना लवकरच फासावर लटकवले जाणार हे निश्चित झाले होते.

याशिवाय, मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या चारही दोषींना नव्या डेथ वॉरंटसाठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर, या दोषींविरोधात गुरुवारी अडीच वाजता डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. या चौघांना मंगळवारी 3 मार्च रोजी फाशी द्यायची असे आधी ठरले होते; परंतु पवन गुप्ता याने ऐनवेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी त्या दिवशीचे डेथ वॉरंट स्थगित केले होते. पवनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर काही तासांतच फाशीच्या नव्या तारखेसाठी म्हणजेच डेथ वॉरंटसाठी अर्ज केला गेला. पवनचा दयेचा अर्ज हा शेवटचा होता.

- Advertisement -

आता चारही खुन्यांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज कुठेही प्रलंबित नाहीत. तेव्हा नव्या तारखेचे डेथ वॉरंट लगेच जारी करावे, असा आग्रह प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी धरला होता. मात्र, दोषींना नोटीस न देता असे वॉरंट काढणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने चारही खुन्यांना औपचारिक नोटीस काढून गुरुवारी सुनावणी ठेवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -