घरताज्या घडामोडीकरोना घेऊन राज्यात येऊच नका

करोना घेऊन राज्यात येऊच नका

Subscribe

अरूणाचल प्रदेश, सिक्कीमने परदेशी पर्यटकांना राज्यात येण्यासाठी परवाने नाकारले आहेत. तर भुतानने दोन आठवड्याची परदेशी पर्यटकांवर बंदी घातली आहे.

करोनाचा कहर पाहता अरूणाचल प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे प्रोटेक्ट एरिया परमीट देणे थांबवण्याचा. आता अरूणाचलमध्ये येणाऱ्या कोणत्याही परदेशी पर्यटकाला राज्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठीच राज्य सरकारमार्फत हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अरूणाचल प्रदेशच्या सीमेलगतच चीनची सीमादेखील आहे. चीनमधून भारतात येताना प्रोटेक्ट एरिया परमीट (पीएपी)चा वापर करूनच भारतात प्रवेश मिळतो.

अरूणाचल प्रदेशचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी पीएपी जारी करणाऱ्या सर्व यंत्रणांना हे परवाने देणे थांबवण्याचे निर्देश दिले. पुढील आदेश मिळेपर्यंत हे परवाने देणे नाकारण्याचे अरूणाचल प्रदेशने ठरविले आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. ज्या पर्यटकाने परदेशातून भारतात प्रवेश केला आहे त्यांच्यामुळेच भारतात या रूग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अरूणाचल प्रदेश सरकारने हा निर्णय़ घेतला असल्याचे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. अरूणाचल पाठोपाठच सिक्कीमनेही परदेशी पर्यटकांना राज्यात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला आहे. तर भारतानजीकच्या भुताननेही परदेशी पर्यटकांना देशात येण्यासाठी दोन आठवड्यांची बंदी घातली आहे. करनोचा वाढता प्रसार कमी करण्यासाठीच भुतानने हे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये थैमान घातल्यानंतर जगभरातील अनेक देशातील अर्थव्यवस्थांवरही परिणाम केला आहे. आतापर्यंत करोनाची लागण झाल्याने जगभरातील विविध देशांमध्ये ३५०० जण मृत्यूमुखी पडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -