घरताज्या घडामोडीनाशिक पोलिसांनी दहशत माजवणार्‍यांची काढली धिंड

नाशिक पोलिसांनी दहशत माजवणार्‍यांची काढली धिंड

Subscribe

व्दारका परिसरात दोनजणांना मारहाण करत दहशत निर्माण करणार्‍या चार गावगुंडांची पोलिसांनी रविवारी (दि.१५) धिंड काढली. चिंटु दिलीप पवार (१९, सर्वजण रा. बागवानपुरा, नाशिक) रुतिक शरणपाल चव्हाण (१९), बंटी लोट, दानिश शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

व्दारका पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (दि.१०) धुलिवंदनाच्या दिवशी क्या रे हमे देखकर क्यू हस रहा है, असे म्हणून कुरापत काढत चौघांनी विकी गवळी (२६) याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. विकीचा भाऊ किरण मध्यस्थी झाला असता त्याला लाकडी दांडके, लोखंडी रॉड, लाकडी बाकडा, दारुच्या बाटलीने मारहाण केली. इसे मार डालो, असे म्हणत चौघांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांची दहशत नाहिशी करण्यासाठी पोलिसांनी चौघांची महात्मा फुले पोलीस चौकी परिसरात धिंड काढली. मारहाणीचा प्रकार पुन्हा आमच्याकडून घडणार नाही, असे चौघेजण सांगत होते. कोणीही भाईगिरी व दहशत पसरवण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी न घाबरता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -