घरमनोरंजन‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलींची मर्जी, म्हणणाऱ्या नेहाच्या नवऱ्याने शेअर केले गर्लफ्रेंडबरोबरचे...

‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलींची मर्जी, म्हणणाऱ्या नेहाच्या नवऱ्याने शेअर केले गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो!

Subscribe

अभिनेत्री नेहा धुपियाचा नवरा अंगद बेदीने आपल्या पाच गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच कारण म्हणजे नेहा सध्या छोट्या पडद्यावरील ‘एमटीव्ही रोडीज’ या शोमध्ये परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच झापलं. ‘एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही’, असं नेहा म्हणाली. पाच प्रियकरांची निवड करणं हा सर्वस्वी त्या मुलीचा निर्णय आहे.’ यावरून तिला ट्रोल करण्यात आलं.

- Advertisement -

अंगद बेदी म्हणतो…

अंगद ने इन्स्टाग्रामवर पाच फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना या माझ्या पाच गर्लफ्रेंड आहेत असं अंगदने लिहीलं आहे. पण अंगदच्या या पाचही गर्लफ्रेंडच्या फोटोत पत्नी नेहा धुपीयाच आहे. अंगदने कॅप्शन लिहीले आहे की, “सुन मेरी बात, ये रही मेरी पांच गर्लफ्रेंड्स, उखाड़ ले जो उखाड़ना है.”

- Advertisement -

काय आहे प्रकरण

‘एमटीव्ही रोडीज’मध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी असं म्हणणाऱ्या नेहा धुपियावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर नेहाने सोशल मीडियावर आपली बाजू मांडणारी पोस्ट लिहीली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -