घरताज्या घडामोडीमंत्रालयात करोनाचा संशयित

मंत्रालयात करोनाचा संशयित

Subscribe

कर्मचाऱ्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यामध्ये करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मंत्रालयातील या कर्मचाऱ्याचा भाऊ अमेरिकेतून आला आहे. तो करोना पॉझिटिव्ह आहे. मंत्रालयातील या कर्मचाऱ्याला ताप व करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे मंत्रालयातील दवाखान्यात या कर्चमाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संशय आल्यामुळे या कर्मचाऱ्याला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. करोना सदृश्य लक्षणांचा संशय आल्यामुळे फक्त वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे डाँक्टरांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -