घरताज्या घडामोडीराज्यातील करोना बाधितांचा आकडा ४९; नगरमधील एकाला लागण

राज्यातील करोना बाधितांचा आकडा ४९; नगरमधील एकाला लागण

Subscribe

राज्यातील करोना बाधितांचा आकडा ४९ वर गेला असून नगरमधील एकाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा आज ४९ वर पोहोचला आहे. मुंबईतील दोन महिलांना या करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली असतानाच आता नगर जिल्ह्यातील नेवासामधील एकाला करोनोची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण दुबईवरुन आला असल्याची माहिती समोर आली असून नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

उल्हासनगरमधील महिलेला लागण

दरम्यान, मुंबईत एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली असून ही व्यक्ती इंग्लंडवरुन परतली असल्याची माहिती समोर आली आहे. तर उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ही व्यक्ती दुबईवरुन आली असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तर बुधवारी रत्नागिरीमध्ये पहिला करोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीतील ५० वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचली आहे.


हेही वाचा – Live Update : हातावर छापा मारणारे इकडे तिकडे फिरतात – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -