घरताज्या घडामोडीव्यायामाअभावी गरोदर मातांना सिझरची भीती

व्यायामाअभावी गरोदर मातांना सिझरची भीती

Subscribe

आरोग्याच्या समस्याही गंभीर; गच्चीवर करावा लागतोय व्यायाम

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडण्यास बंदी घातल्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्री-अपरात्री त्रास झाल्यास त्यावेळी कोणत्या दवाखान्यात जायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. तसेच नियमित व्यायाम करणे शक्य होत नसल्याने सिझर होण्याची भीती बळावली आहे.

करोनामुळे छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्यांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. यात गरोदर मातांचाही समावेश झाल्याचे दिसून येते. त्यांना हलक्या स्वरुपाचा व्यायाम, मोकळ्या हवेत फिरण्याची आवश्यकता असते. मात्र, घराबाहेर पडण्याची भीती त्यांनाही वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत करोनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी घरात राहणेच पसंत केले असले तरी, आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यात प्रामुख्याने मनाप्रमाणे खाद्यपदार्थ मिळत नाही. अचानक काही त्रास झाला तर कोणत्या डॉक्टरकडे जायचे याविषयी त्यांच्या मनात धास्ती आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने अनेक महिलांनी गच्चीवर हलक्या स्वरुपाचा व्यायाम सुरु केला. मात्र, पायर्‍या चढून जाण्याची रिस्क त्यांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे व्यायाम केला नाही तर सिझर तर करावे लागणार नाही? अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
&
महत्वाच्या समस्या
-दिवसभरात एक ते दीड किलोमिटर फिरायला जाण्याची सवय
-बाजारपेठ बंद असल्याने आहारात नाविण्याचा अभाव
– ’सिझर’व्दारे प्रसूती होण्याची भीती
-नियमित तपासणीसाठी दवाखान्यात जाण्याची समस्या
-डॉक्टरच वेळ देत नसल्यामुळे मोठी अडचण
– बाजारपेठ बंद असल्याने आवडीच्या पदार्थांचा तूटवडा

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -