घरCORONA UPDATEकरोनाग्रस्तांना शोधून काढणार सरकारचे Corona Kavach अॅप

करोनाग्रस्तांना शोधून काढणार सरकारचे Corona Kavach अॅप

Subscribe

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. पण तरीही करोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कारण करोनाची लागण झालेल्या व्यक्तीलाही आपल्याला लागण झाल्याचे उशीरा समजते. यादरम्यान या व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येतात. ज्यांना पुढे करोनाची लागण होते. यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकार करोनाग्रस्तांना शोधून काढणारे Corona Kavach अॅप तयार करत आहे.

हे अॅप बीटा वर्जनचे असून त्याची चाचणी करण्यात येत आहे. हे अॅप यूजर्सला त्याच्या आजबाजूला कोणी करोनाग्रस्त आहे का याची माहिती देणार आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्स गूगल स्टॉर प्लेमधून Corona Kavach अॅप डाऊनलोड करू शकणार आहेत. हे अॅप माहिती आणि तंत्रज्ञान विभाग तयार करत आहे. अॅपची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. असेच अॅप सिंगापुरनेही बनवले असून त्याला TraceTogether अॅप नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

Corona Kavach अॅप यूजर्सचे लोकेशन अॅक्सेस करू शकणार आहे. यामुळे यूजर्स कुठे जातोय यावर लक्ष ठेवता येणार आहे. जर या व्यक्तीचा लोकेशन डेटा Covid-19 च्या यूजर्सच्या डेटाबरोबर मॅच झाला तर .ूजर्सला नोटीफिकेशन मधून सर्तक करण्यात येणार आहे. यात सेल्फ क्वारनटाईन व्यक्तींचा पण डेटा असणार आहे. पण Covid-19 झालेल्या रुग्णाची ओळख मात्र सार्वजनिक करण्यात येणार नाही. या अॅपमध्ये कलर कोंडींगचाही वापर करण्यात येणार आहे. जर तुम्ही क्वारनटाईन व्यक्तीच्या भागात जात असाल तर जवळील रुग्णालय प्रशासनाला याबद्दल कळवले जाईल. यात जर तुमच्या मोबाईलमध्ये हिरवा रंगाचा फ्लॅश आला तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी प्रवास करत आहात. जर लाल रंगाचा फ्लॅश तेव्हा येईल जेव्हा तुम्हांला किंवा समोरच्या व्यक्तीला करोनाची लागण झालेली असेल.

हे अॅप तुम्हाला स्मार्ट फोनमध्येमध्ये इन्स्टॉल करावे लगणार आहे. लॉगइनसाठी तुम्हांला तुमचा नंबर अॅपवर नोंदवावा लागणार आहे. नतर ओटीपी नंबर आल्यानंतर तुम्ही हे अॅप वापरू शकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -