घरCORONA UPDATEहोम क्वारंटाइन आयएएस अधिकाऱ्याचे पलायन, झाली निलंबनाची कारवाई

होम क्वारंटाइन आयएएस अधिकाऱ्याचे पलायन, झाली निलंबनाची कारवाई

Subscribe

केरळमधील होम क्वारंटाइन असलेला आयएएस अधिकारीच घरातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केरळमधील होम क्वारंटाइन असलेला आयएएस अधिकारीच घरातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर या आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होम क्वारंटाइन असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने नियम तोडून घरातून पलायन केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा अधिकारी नुकताच परदेशातून हनिमूनवरुन आला होता. देशातील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्याला होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने नियमांचे उल्लघन करत तिथून पळ काढला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कोल्लमचे उप-जिल्हाधिकारी अनुपम मिश्रा असे या पलायन केलेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा – ‘रामायण’ नंतर आता ‘महाभारत’ही पुन्हा दाखवणार; ‘शक्तिमान’ही आहे जोरात

- Advertisement -

अनुपम मिश्रा हा मूळाचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे कोल्लमचे पोलीस अधीक्षक टी. नारायणन यांनी ही माहिती दिली. अनुपम मिश्रा हा मलेशिय-सिंगापूरला हनिमूनसाठी गेला होता. तो १९ मार्च रोजी केरळला परतला. त्यावेळी त्याला प्रोटोकोलप्रमाणे निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. सोबतच त्याच्या अंगरक्षकाला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. करोनाची कोणतीही लक्षणे न जाणवल्याने त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले. मात्र कोणालाही न सांगता त्याने बंगळुरू शहर सोडले. त्याच्याशी संपर्क साधला असता, मी बंगळुरुमध्येच असल्याचे त्याने खोटे सांगितले. अधिकाऱ्याने कुटुंबासोबत बंगळुरू सोडल्याची माहिती नासेर यांनी दिल्यानंतर पोलिसांनी मिश्राचे मोबाईल लोकेशन चेक केले असता तो उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये असल्याचे समजले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -