घरCORONA UPDATECoronaVirus - करोनाग्रस्त डॉक्टरांनी केले रूग्णावर उपचार, ओपीडी होणार बंद !

CoronaVirus – करोनाग्रस्त डॉक्टरांनी केले रूग्णावर उपचार, ओपीडी होणार बंद !

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर सैफी हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर बंद करण्याचे तसेच ओपीडीही बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहीती उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी शनिवारी दिली.‌ मुंबईतील सैफी हॉस्पिटलमधील सर्जन आणि त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आले. या सर्जनच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. हे सर्जन कोरोनाबाधित असूनही त्यांनी रुग्णांवर उपचार केले. ते ऑपरेशन थिएटर आणि ओपीडी विभागच पालिकेने बंद केला.

या सर्जन डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध म्हणून सर्वांचे स्वाब नमुने घेण्यात आले असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले. हिंदुजा हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला असताना तेथील कर्मचारी डॉक्टर यांची स्वाब चाचणी करण्यात आली होती.

- Advertisement -

सैफी हॉस्पिटलमध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायक असल्याने मुंबई महापालिकेने कडक पा़ऊल उचलले आहेत. दरम्यान, सैफी हॉस्पिटल‌मधील दाखल रुग्णांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. संसर्गजन्य आजाराच्या मार्गदर्शक तत्वाने ऑपरेशन थिएटर आणि ओपीडी असलेला मजलाच सील करण्याचे आदेश दिले असल्याचे ही सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -