घरमुंबईमुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांच्या वाहनांवरच कारवाई

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांच्या वाहनांवरच कारवाई

Subscribe

महापालिका मुख्यालय परिसरात कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

एका बाजुला मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांना रेल्वे तसेच अन्य वाहनांची सुविधा नसतानाही यावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे आपल्या वाहनांनी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनेच वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून उचलली जात आहे. महापालिका मुख्यालयाच्या परिसरातच अशाप्रकारची घटना घडत असल्याने कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांकडून तक्रार प्राप्त होवूनही अद्याप महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना कोणत्याही सुचना न केल्यामुळे मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली वाहने उभी कुठे करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथून, प्रवेशद्वार क्रमांक ६ आणि ७ येथून , या महापालिका कर्मचाऱ्यांच्या २ चाकी आणि ४ चाकी वाहनांवार वाहनांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आहे. विशेष म्हणजे या सर्व वाहनांवर ‘बीएमसी’ असे लिहिलेले असतानाही इमारतीच्या परिसरातील पदपथावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेतील सर्व कामगार, कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर विभागांचे कर्मचारीही वरिष्ठांच्या आदेशानुसार कामाला येत आहे. त्यामुळे कार्यालयापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर राहणारे कर्मचारी आणि अधिकारी २ चाकी वाहने घेऊन कार्यालयात येतात. तसेच बसची सुविधेचा लाभ न मिळणारे कल्याण, डोंबिवली, विरार, नालासोपारा येथीलही कामगार व कर्मचारी २ चाकीने येत असतात. महापालिका मुख्यालयाजवळील महानगरपालिकेच्या अधिकृत वाहनतळाच्या जागेवर मेट्रो चे काम सुरु असल्याने आपली वाहने कुठे उभी करायची ही मोठी समस्या कर्मचाऱ्यांपुढे आहे.


लॉकडाउनची ऑर्डर असूनही तबलीगी जमातीचा कार्यक्रम कसा चालला?

यासंदर्भात ए विभागाच्या परिरक्षण विभाग आणि वाहतूक आणि समन्वय विभागामार्फत व्यवस्था करणे अपेक्षित असतानाही, वाहतूक पोलीस मागील महिन्यापासून कर्मचाऱ्यांची वाहने उचलून त्यांना दंड लावत आहेत. आता तर कोरोनाच्या पाश्वभूमीवर कर्तव्यावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवरही कारवाई केली जात असल्याची खंत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी नगरसेवकांच्या वाहनांवरही अशाचप्रकारे कारवाई करण्यात येत होती. परंतु आता रस्त्यांवर वाहने कमी असून जे अत्यावश्यक सेवेतील कामगार आहे, त्यांच्याच जर वाहनांवर कारवाई होणार असेल तर आम्ही वाहने आणायची कशी असा सवालही कामगार व कर्मचाऱ्यांनी केला आहे.

एक प्रतिक्रिया

  1. वाहतुकीला अडथळा होतो म्हणून वाहने उचलणे समजता येईल पण ह्या घडली रस्त्यावर वाहनेच नाहीत मग जाणून बुजून वाहतूक विभाग ही कारवाई करत आहे. उद्या सर्वच कर्मचारी यांनी कामाला येण्यास नकार दिला तर वाहतूक विभाग महापालिकेचे काम करणार आहे का?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -