घरCORONA UPDATEमुंबईतील निराधारांना डिफेन्स आणि स्वयंसेवी संस्थाचा आधार

मुंबईतील निराधारांना डिफेन्स आणि स्वयंसेवी संस्थाचा आधार

Subscribe

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित राहाव यासाठी जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुंबईत हातावर पोट असणाऱ्यांची मात्र अन्नान दशा झाली आहे. खाण्यास अन्न नाही डोक्यावर छप्पर नाही या अवस्थेत कोरोनाचा सामना करणाऱ्या या स्थलांतरितांच्या मदतीला नागरि संरक्षण दल , रिलायन्स ग्रुप व अनेक स्वयंसेवी संस्था धावून आल्या असून वर्सोवा येथे या नागरिकांच्या राहण्या खाण्याची सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

यात प्रामुख्याने नागरी संरक्षण दलाबरोबरच महानगरपालिका, हार्मेनी फाऊंडेशन आणि अमिन पवार यांचा मोठा वाटा आहे. पवार यांनी नागरिकांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून तंबू पुरवले असून वर्सोवा येथे मैदानात या नागरिकांची सोय करण्यात आली आहे. तसेच रिलायन्स फाऊंडेशननेही यात मोठे योगदान दिले असून नागरिकांसाठी अंथरुन पांघरुनाची सोय केली आहे. इस्कॉन व नसीम सिध्दीकी यांनी या नागरिकांच्या जेवणाची सोय केली असून सरकरी अधिकारी मुंबईबरोबरच ठाणे व रायगड येथे अन्न वाटपाचे काम करत आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत २००० मास्कचेही वाटप करण्यात आले आहे. यात आगा खान फाऊंडेशन, चंद्रा फाऊंडेशन, मनी लाईफ फाऊंडेशनही मोठा हातभार लावला आहे.

- Advertisement -

तसेच या नागरिकांची ने आण करण्यासाठी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख ग्रेस पिंटो यांनी त्यांच्या बसेस वापरण्यास देऊन सर्वेतोपरि मदत केली आहे. पालिकेचे डॉक्टर येथे नागरिकांची तपासणी करत आहेत. गेल्या आठवड्यापासून या सामाजिक कार्यास आम्ही सुरूवता केली असून तब्बल २८२ नागरिकांची येथे सोय करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -