घरदेश-विदेशभारताला तेलाचा पुरवठा करणाऱ्या यादीत इराण दुसऱ्या क्रमांकावर

भारताला तेलाचा पुरवठा करणाऱ्या यादीत इराण दुसऱ्या क्रमांकावर

Subscribe

पेट्रोलियम मंत्रालयाकडून नुकतीच आकडेवारी जाहीर...

भारताला तेल पुरवणाऱ्या देशांच्या यादीत इराण दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सौदी अरेबियाला मागे सोडत इराणने दुसरा क्रमांक गाठला आहे. ही आकडेवारी एप्रिल ते जून महिन्यादरम्यानची असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. प्रधान यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये ही माहिती नमुद केली होती. इराणकडून तेल विकत घेणाऱ्या देशांच्या यादीत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्षाच्या सुरवातीच्या तीन महिन्यांमध्ये ५.६७ दशलक्ष टन म्हणजेच सुमारे ४ लाख ५७ हजार बॅरल कच्चे-तेल प्रतिदिन भारतात पाठवले गेले. एप्रिल ते जून महिन्यात ३.४६ दसलक्ष टन म्हणजेच २ लाख ७९ हजार बॅरल कच्चे-तेल प्रतिदिन मागवण्यात आले. हे प्रमाण सौदी अरेबियाहून जास्त आल्याचे प्रधान यांनी सांगितले.

अमेरिकेचा इराणवर प्रतिबंध
अमेरिकेने इराणवर अनेक प्रतिबंध लावले आहेत. मात्र इतर देशांना तेल पुरवण्यासाठी इराण विविध योजना राबवत आहे. याचाच फायदा घेत भारत अधिकाधिक तेल आयात करत आहे. त्यामुळेच तेल आयात करणाऱ्या देशांच्या यादीत इराण तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला. इराण बरोबर वाढत्या व्यापाराचा अमेरिका विरोध करत आहे. इराणवरुन तेल आयात कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासन दिल्लीवर जोर देत आहे. इराणजवळून तेल विकत घेतल्यामुळे भारातावर आंतरराष्ट्रीयस्थरावर राजकीय दबाव योतोय. एका मार्यादित वेळेपर्यंतच भारत इराणकडून तेल आयात करु शकतो. ही मर्यादा संपल्यावर भारत अन्य पर्यायांचा शोध करणार आहे.

- Advertisement -

९.८ दशलक्ष कच्चे-तेल रिफाईन
इंडियन ऑइल कॉर्प, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि युनिट भारत ओमान रिफाइनरीज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि मंगलोर रिफायनरी ऍण्ड पेट्रोकेमिकल्स या कंपन्यांमधून ९.८ दशलक्ष टन इराणी कच्चे-तेल रिफाईन करण्यात आलं आहे. यावर्षी ही आयात दुप्पट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयात केलेले कच्चे-तेल रिफायनरीमध्येच रिफाईन केले जाते. याचे रुपांतर पेट्रोलियममध्ये करण्यत येते.

भारताव्यतिरीक्त आयात करणारे इतर देश
इराणकडून भारताव्यतिरीक्त अन्य देशही कच्चे-तेल आयात करतात. या देशांच्या यादीत चीन आघाडीवर आहे. याच बरोबर सौदी, इराक आणि कुवैत यांनाही इरणमधून तेल निर्यात केलं जाते. अमेरिका आणि इराणमध्ये संबध चांगलेनसल्यामुळे इराणवर बंदी घालण्यात येत आहे. इराण बरोबर व्यवहार करणाऱ्या देशांबरोबर अमेरिका व्यवहार करणार नसल्याचे ट्रम्प सांगत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -