घरमनोरंजनइरफान खानचा चित्रपटात कमबॅक ?

इरफान खानचा चित्रपटात कमबॅक ?

Subscribe

इरफान खान लवकरच सिनेमात कमबॅक करणार असल्याच्या चर्चेमुळे, त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असणार.

बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार आणि रिअल अभिनयाची छाप पाडणार इरफान खान, सध्या लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतो आहे. मध्यंतरी इरफानने सोशल मीडियावर एक पत्र लिहीत चाहत्यांना भावूक केलं होतं. नुकताच इरफानचा एक ताजा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत पिवळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेल्या इरफानच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य त्याच्या चाहत्यांना सुखावणारं होतं. दरम्यान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’वर उपचार घेत असलेला इरफान बॉलीवूडमध्ये परतणार का? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. इरफान खान लवकरच बॉलीवूडचा नवा चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या बद्दल चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप कोणती घोषणा करण्यात आली नाहीये. असं असलं तरी या चर्चेमुळे इरफानच्या चाहत्यांमध्ये या बातमीमुळे उत्सुकता ताणली गेली असणार हे नक्की.

कोणत्या सिनेमातून कमबॅक?

निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी, इरफानच्या तब्येतीचे अपडेट्स त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. ‘इरफानच्या तब्येतीमध्ये सध्या सुधारणा होत असून त्याची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं’, त्याने नुकतच म्हटलं होतं. ‘आम्ही दररोज एकमेकांशी व्हॉट्सअॅपवरुन बोलत असतो. इरफान त्याचा फावला वेळ कधी क्रिकेट मॅचेस पाहण्यात घालवतो, तर कधी त्याने गायलेली गाणी तो मला व्हॉट्सअॅपवर पाठवतो’, अशी माहितीही विशालने दिली होती. दरम्यान विशाल भारद्वाज आणि इरफानच्या कायम संपर्कात असण्याच्या मुद्दायवरुन, इरफानचा नवीन सिनेमा विशाल भारद्वाजचाच असणार, अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, विशालकडून याबाबतीच कोणतीच घोषणा करण्याक आलेली नाहीये. ‘इरफाससोबत सर्वांच्या प्रार्थना असून, तो लवकर बरा होऊन भारतात येणार यावर माझा विश्वास आहे’, असं विशाल भारद्वाजने म्हटलं आहे.

- Advertisement -

चाहत्यांना केलं भावूक

आयुष्यात अचानक आलेल्या या वळणामुळे माझं सपूर्ण आयुष्यच बदलून गेल्याचं, इरफानने मध्यंतरी म्हटलं होतं. सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पत्रात याविषयीचं आपलं मत मांडत, इरफानने चाहत्यांना भावूक केलं होतं. ‘हा आजार दुर्मिळ आहे किंवा याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. याचे उपचार खूप कमी आहेत हे सगळं आता माझ्या सहज लक्षात आलं आहे. आता माझ्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग झालाय जणू…’ असं म्हणत इरफाने त्याच्या भावना या पत्रात मांडल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -