घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिकमध्ये आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयास शुक्रवारी (दि.10) रात्री 31 जणांचे रिपोर्ट मिळाले असून 28 रिपोर्ट निगेटिव्ह व 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोन नाशिक शहरातील व एक मालेगावातील आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.  नाशिक जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण व संशयित रुग्णांची संख्या बुधवार (दि.8)पासून वाढू लागली आहे. मालेगावात बुधवारी व गुरुवारी प्रत्येकी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा रुग्णालयातच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ( दि.10) दुपारी जिल्हा रुग्णालयास 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह मिळाले होते. त्यात 25 जण नाशिक शहर व सहाजण मालेगावातील आहेत. शुक्रवारी रात्री पुन्हा 31 जणांचे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले आहेत. 28 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  एकजण माळेगावातील आहे. तर दोन पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक शहरातील नाशिक रोड व नवश्या गणपती परिसरातील असल्याचे समजते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -