घरट्रेंडिंगVideo - लॉकडाऊनमध्ये रिेतेश- जेनेलियाच्या प्रेमाला ऊत, व्हीडिओ केला शेअर!

Video – लॉकडाऊनमध्ये रिेतेश- जेनेलियाच्या प्रेमाला ऊत, व्हीडिओ केला शेअर!

Subscribe

बॉलिवूड मधील क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. रितेश आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडचं कपल नेटकऱ्यांचं खूप लाडकं आहे. आणि माऊलही कोणाला नाराज करत नाही तो कायमच जेनेलिया बरोबर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्या दोघांच्या व्हीडिओला खूप लाईक्स आणि कमेंट्यस ही चाहते देत असतात. नुकताच लॉकडाऊनच्या निमित्ताने रितेशने आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

रितेश-जेनेलियादेखील घरीच असून सध्या ते त्यांच्या क्वालिटी टाइम व्यतीत करत आहेत. विशेष म्हणजे हे दोघं टिकटॉकवर जास्त सक्रीय असून सध्या त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या व्हीडीओत रितेश जेनेलियाच्या प्रेमात कसा पडलो, जेनेलियावर किती प्रेम आहे हे सांगत आहे. हा व्हीडिओ अपलोड करताना त्याने माधूरी दीक्षित आणि संजय दत्तला टॅग केलं आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. प्रत्येकालाच प्रश्न पडतो आपल्याप्रमाणे सेलेब्रेटी घरातबसून काय करत असतील. असा प्रश्न पडला असेल तर सध्या रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत असच म्हणावं लागेल.

रितेश घासत होता भांडी

या आधी रितेशने अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त हा व्हीडिओ शेअर केला आहे. अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हा व्हीडिओ रितेशने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशची पत्नी जेनेलिया त्याच्याकडून चक्क भांडी घासून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकराऊंडला अजय देवगनच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘मौका मिलेगा तो हम बता देंगे’ हे गाणे वाजत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -