घरCORONA UPDATELockdown- 'शंकराला दूध पाजा, कोरोना घालवा' लोकांच्या लागल्या रांगा!

Lockdown- ‘शंकराला दूध पाजा, कोरोना घालवा’ लोकांच्या लागल्या रांगा!

Subscribe

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथील शमशेरगंज कस्बेमध्ये राहणाऱ्या राजेश कौशल यांनी अफवा पसरवली की त्याच्या घरासमोर शंकाराच्या मंदिरातील मुर्ती दूध पिते.

देशात उत्तरप्रदेशमध्ये आत्तापर्यंत ४३१ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यातील ३२ रूग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या काळात अंधश्रध्दाही वाढीस लागल्याच बघायला मिळत आहे. कोणी गोमूत्र पार्टी करतय तर कोणी होम हवन करत आहे. त्यातच आता या महामारीपासून वाचण्यासाठी शंकराच्या मुर्तीला दूध पाजत आहेत.

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथील शमशेरगंज कस्बेमध्ये राहणाऱ्या राजेश कौशल यांनी अफवा पसरवली की त्याच्या घरासमोर शंकाराच्या मंदिरातील मुर्ती दूध पिते. या अफवेनंतर शंकराच्या मुर्तीला दूध पाजण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या. लोकांना आपल्या शहरात लॉकडाऊन सुरू आहे याचाही विसर पडला. त्यामुळे लॉकडाऊन मोडल्याच्या विरोधात पोलिसांनी १३ जाणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या विषयी बोलताना पोलिस अधीक्षक अभिषेक सिंह म्हणाले, आम्हाला समजले की राजेश कौशल यांनी अफवा पसरवली की, त्याच्या समोरील मंदिरातील शंकराची मुर्ती दूध पीत आहे. हे ऐकताच लोकांनी गर्दी केली. लोकांनी शहरात लागू झालेल्या १४४ कलमाचं लोकांनी उल्लंघन केलं. या घटनेत आम्ही १३ लोकांना ताब्यात घेतले आहे.


हे ही वाचा – पोटात अन्नाचा कण नाही…८ दिवसाच्या बाळाला कसं जगवू? एका हतबल आईची व्यथा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -