Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE पोटात अन्नाचा कण नाही...८ दिवसाच्या बाळाला कसं जगवू? एका हतबल आईची व्यथा!

पोटात अन्नाचा कण नाही…८ दिवसाच्या बाळाला कसं जगवू? एका हतबल आईची व्यथा!

Subscribe

ही गोष्ट केवळ एका कामगार कुटुंबाची नाही तर असंख्य कामगार लॉकडाऊनमध्ये होरपळले जात आहेत. 

देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुरूवातीला ३१ एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. अनेक मजुरांनी लॉकडाऊन जाहीर होताच मुंबईत ते गावी असा पायी प्रवास सुरू केला. दिल्ली, मुंबई सारख्या शहरातील मजुरांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोजचा एक एक दिवस पुढे ढकलणं यांच्यासाठी कठीण झालं आहे. एकवेळचं जेवण मिळणही या मजदुरांसाठी कठीण झालं आहे.

अशीच एक दिल्लीतील घटना समोर आली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान एका महिलेने एका मुलीला जन्म दिला. ना त्यांच्याकडे हॉस्पिटलला जाण्यासाठी पैसे होते ना साधन, २२ वर्षाची महक आणि तीचे पती गोपाल उत्तरखंडमधील नैनीताल येथे एका गावात रहात असतात. सध्या दिल्लीच्या टाऊनहॉल परिसरातील एका सोसायटीत मजदूर म्हणून काम करतात. पण लॉकडाऊनमुळे सगळंच बंद झालं आहे. या विषयी बोलताना महक सांगत होती, दोन दिवसात केवळ एकवेळा अन्न नशीबात होणं कठीण झालं आहे. मी केवळ १ मुठ तांदूळ खाल्ले आहेत. त्यामुळे अंगावर दूध तयार होत नाही… त्यामुळे मी माझ्या मुलीला आता काय पाजू असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पुढे महेक म्हणाली, आता केवळ घरात थोडासाच तांदुळ उरला आहे. त्यात माझ्या चार मुलांना खायला घालायचं आहे. चूल बंद आहे कारण घरात स्वयंपाक करायला काहीच नाहीये. करनाल, हरियाणाच्या भट्टीत महेक आणि तीचा पती काम करत होते. त्यानंतर त्यांनंतर त्यांनी चालत दिल्ली गाठली.

आपल्या आठ दिवसाच्या मुलीला तांदुळ, पाण्याबरोबर खायला देणार आहे. दिल्ली सरकार सगळ्यांना रेशनकार्डधारकांना रेशन देत आहेत. मात्र दिल्लीतील अशा मजदूरांच काय ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीये. त्याचप्रमाणे सरकारने प्रवासी मजदूरांसाठी वेबसाईट तयार केली आहे. तीथे नाव रजिस्टर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेले ३ दिवस वेबसाईट हँग झाली आहे.

- Advertisement -

आता या दोघांजवळचे पैसे संपले आहेत. रेशनही संपत आलं आहे. जवळच असणाऱ्या शाळेत दिल्ली सरकारकडून जेवणं देण्यात येतं. मात्र जेवणासाठी बाहेर पडलं तर पोलिस मारतात. त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न कामगारांसमोर उभा राहिला आहे. ही गोष्ट केवळ एका कामगार कुटुंबाची नाही तर असंख्य कामगार लॉकडाऊनमध्ये होरपळले जात आहेत.


हे ही वाचा – ‘नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त…’


 

- Advertisment -