घरताज्या घडामोडीधारावीपाठोपाठ 'हे' परिसर ठरले कोरोनाचे हॉटस्पॉट

धारावीपाठोपाठ ‘हे’ परिसर ठरले कोरोनाचे हॉटस्पॉट

Subscribe

प्रभादेवी, वरळी कोळीवाडा आणि धारावी पाठोपाठ आता मुंबईतील काही परिसर हॉटस्पॉट बनले आहेत.

प्रभादेवी, वरळी कोळीवाडा आणि धारावी या परिसरात सर्वात अधिक कोरोनाबाधितांची संख्या आढळून आली होती. त्यापाठोपाठ आता दादर, माहीम परिसरातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. या परिसरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जी उत्तर विभाग चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे.

धारावीत कोरोनाबाधितांची संख्या ६० वर

मरकज येथून आलेले दोघे जण कोरोनाबाधित असल्याचे उजेडात आले होते. तर तेथूनच आलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी धारावी येथे मृत्यू झाला. दरम्यान, जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या आता ९७ वर गेली आहे. तर आतापर्यंत धारावीत ६० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर माहीम परिसरात बुधवारी तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून माहीम परिसरात कोरोनाची संख्या ९ वर गेली आहे. तर दादरमध्ये दोन नवे कोरोनाबाधित आढळले असून दादरमध्ये कोरोनाची संख्या २१ वर गेली आहे.

- Advertisement -

धारावीत बुधवारी मुकुंदनगरमधील ४७ आणि ३९ वर्षांच्या व्यक्तीला राजीव गांधी क्रीडा संकुलात ठेवले होते. त्यातील एकाचा बुधवारी मृत्यू झाला. तर, मंगळवारी कोरोनाची लागण झालेल्या वडाळा बस आगरामधील विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – लष्कर प्रमुख आज काश्मीर दौऱ्यावर; पाकिस्तानला भरली धडकी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -