घरमनोरंजनVideo: लॉकडाऊनमध्ये राजकुमार रावने केला आपल्या प्रेयसीचा हेअरकट!

Video: लॉकडाऊनमध्ये राजकुमार रावने केला आपल्या प्रेयसीचा हेअरकट!

Subscribe

राजकुमारचा केस कापतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असलं तरी सोशल मीडियावर मात्र बॉलिवूड स्टार्सची चांगलीच चर्चा आहे. लॉकडाऊन असल्याने सगळेच कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसतंय. कोण कोणासाठी स्पेशल जेवणाचा बेत आखतंय तर कोण कोणासाठी घरकाम करतंय. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या वेगळ्या अभिनयाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र यावेळी तो अभिनयाने नाही तर त्याच्या प्रेयसीमुळे चर्चेत आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो चक्क अभिनेत्री पत्रलेखाचे केस कापताना दिसतोय.

- Advertisement -

 

लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या राजकुमारने आपल्या प्रेयसीचे म्हणजेच पत्रलेखाचे केस कापल्याचे या व्हिडीओतून दिसतंय. हा हेअरकट केल्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत चर्चेचा विषय झाला आहे.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांपासून पत्रलेखा आणि राजकुमार राव लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असून ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.


Video – लॉकडाऊनमध्ये विकीचा हेअरकट कोणी केला माहितेय का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -