घरCORONA UPDATEमहिला हेल्पलाईनवर विचित्र कॉल; २४ मार्चपासून पती बिन आंघोळीचा, रोज करतो सेक्सची...

महिला हेल्पलाईनवर विचित्र कॉल; २४ मार्चपासून पती बिन आंघोळीचा, रोज करतो सेक्सची मागणी!

Subscribe

लॉकडाऊननंतर महिला अत्याचाराच्या घटनेनात वाढ झालेली दिसत आहे. यासाठी सरकारने खास हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसाय, ऑफिसेस बंद आहेत. त्यामुळे सर्व नागरिक घरीच आहेत आणि दिवसभर एकत्र कुटुंबाबारोबर वेळ घालवत आहे. याच दरम्यान एक वेगळीच घटना समोर आली आहे. बंगळुरू पोलिसांच्या महिला हेल्पलाईनवर एका महिलेचा कॉल करुन आपली तक्रार दाखल केली आहे.

लॉकडाऊननंतर महिला अत्याचाराच्या घटनेनात वाढ झालेली दिसत आहे. यासाठी सरकारने खास हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. बंगळुरू येथील एका महिलेने पोलिसांच्या परिहार या विशेष हेल्पलाईनवर कॉल करुन आपली तक्रार दाखल केली. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तिच्या नवऱ्याने आंघोळ करणं बंद केलं आहे. गेल्या २४ मार्चपासून पतीने आंघोळ केली नाही आणि दररोज सेक्सची मागणी करतो.

- Advertisement -

पीडित महिलेचा पती एका किराणाच्या दुकानात काम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दुकान बंद आहे आणि तेव्हापासून त्याने आंघोळ करणंही बंद केली आहे. सध्या रोगराईमुळे स्वच्छता राखणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे. हे पतीने वारंवार सांगूनही पती तिचं ऐकत नाही. उलट तीलाच मारहाण करतो.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासाठीच विविध राज्यांतील पोलिसांनी विशेष हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. त्याच प्रमाणे बंगळुरूमधील या महिलेने केलेली तक्रार ही सुद्धा त्याचाच एक प्रकार आहे. या आधी अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. बाहेरील देशातही अशाच घटना घडल्याचं समोरं येत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन संपवा, ‘घरात पती दिवसरात्र देतोय त्रास’; महिलेची व्यथा


 

एक प्रतिक्रिया

  1. ha prakar 90takke ghrat chLu aahe,, aani ashya vichitra budhichya :nowuryanpasun; aamhala kuni vachwu shakal? jr madatch karaychi asl tr aamchy (आयु) tun gayab kara?tyanla hi ekach madat howu shakte,,,,,.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -