घरCORONA UPDATECorona Live Update: दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात वाघाचा मृत्यू; कोरोनाची टेस्ट होणार

Corona Live Update: दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात वाघाचा मृत्यू; कोरोनाची टेस्ट होणार

Subscribe

दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात एका १४ वर्षीय वाघाचा बुधवारी मृत्यू झाला. किडनी फेल झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता या वाघाच्या रक्ताचे नमुने कोरोना टेस्टसाठी पाठविण्यात आले आहेत. अमेरिकेत एका वाघाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच जगभरात अनेक ठिकाणी प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

 



राज्यात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्राची मान्यता – टोपे

- Advertisement -

कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

 


प. महाराष्ट्रातील २७ उद्योग सुरू! २००० कामगारांचा रोजगार सुरू!

पश्चिम महाराष्ट्रात काही मोठ्या उद्योगांना सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकूण २७ उद्योग सुरू झाले असून त्यामुळे २ हजारांच्या आसपास कामगारांच्या हाताला काम मिळालं आहे. हे सगळे उद्योग कोरोना हॉटस्पॉटच्या बाहेरचे उद्योग असून पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. यामध्ये सांगलीतील किर्लोस्कर इंडस्ट्रीज, साताऱ्यातल्या कमिन्स उद्योग समूहाचे ३ प्रकल्प, पुण्यातील पेन्ना सिमेंट, बल्लारपूर पेपर्स अशा उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगातल्या कामगारांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था कंपनीतच करण्याची अट टाकण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये देखील बजाज कंपनी सुरू झाली असून ४०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.


सोशल डिस्टन्सिंगच्या काळात दोन गज दूरी कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करू शकते. पण त्यासोबतच आपण हेही पाहिलं आहे की भारताचा नागरिक अपुऱ्या साधनांसोबत त्यांच्यासमोर झुकण्याऐवजी त्याचा सामना करतो आहे. अडचणी येत आहेत. पण संकटाचा सामना करत नव्या ऊर्जेसह लढा कायम ठेवतोय – पंतप्रधान नरेंद्र मोदी


ग्रामपंचायतींच्या संपूर्ण डिजिटायझेशनच्या दिशेने ई ग्राम स्वराजच्या माध्यमातून पाऊल टाकलं जात आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


देशात एकेकाळी १०० हून कमी पंचायती इंटरनेट ब्रॉटबँडने कनेक्ट होत्या. आज सव्वा लाखाहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबँड पोहोचलं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


कोरोनाच्या संकटात आपण सगळ्यात महत्त्वाची बाब शिकलो ती म्हणजे आपल्याला आता स्वावलंबी व्हावंच लागेल. त्याशिवाय अशा संकटांचा सामना आपण करूच शकणार नाही. विशेषत: गावांनी स्थानिक स्तरावर, राज्यानं राज्य स्तरावर आणि अशा प्रकारे सर्व देशानं स्वावलंबी होण्याची गरज आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आपल्या देशातल्या पंचायतींची यात सर्वात मोठी भूमिका आहे. त्यामुळे पंचायती जितक्या मजबूत होतील, तितकाच देश सुद्धा मजबूत होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आज २४ एप्रिल या पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या काही सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय करता येईल? यावर मोदींनी सरपंचांशी विविध मुद्द्यांच्या आधारे चर्चा केली.


अमेरिकेत कोरोनाचा हाहा:कार, विषाणूने घेतला ५० हजार २४३ जणांचा बळी. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनामुळे ३ हजार नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.


कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारने वारंवार घरातच राहण्याचं आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडलातच, तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील राज्याच्या आणि देशाच्याही अनेक भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्लीतली आज सकाळची ही दृश्य!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -