घरCORONA UPDATEकोरोना काही गंभीर आजार नाही, ९०-९५% रुग्ण बरे होतायत - एम्स

कोरोना काही गंभीर आजार नाही, ९०-९५% रुग्ण बरे होतायत – एम्स

Subscribe

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना या आजाराबाबत लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांच्याही वर गेली असून मृतांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असं असलं, तरी कोरोना हा काही गंभीर आजार नाही, अशी भूमिका देशातील उपचार क्षेत्रातली प्रमुख संस्था असलेल्या एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने घेतली आहे. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांपैकी ९० ते ९५ टक्के रुग्ण बरे होत असल्यामुळे कोरोनासाठी घाबरून जायची गरज नाही, फक्त काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले गुलेरिया?

यावेळी गुलेरिया म्हणाले, ‘कोरोना हा काही गंभीर आजार नाही. यातून ९० ते ९५ टक्के रुग्ण बरे होत आहेत. जर आपण तो गंभीर समजून घाबरून घरातच बसून राहिलो, उपचारांसाठी पुढे आलो नाही, तर फक्त आपण उशीर केल्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा मृत्यूदर वाढल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते’. ‘या आजाराच्या भोवती प्रचंड भिती निर्माण झाल्यामुळे लोकं घाबरून उपचारांसाठी किंवा लक्षणं दिसली तरी पुढे येत नाहीयेत. याचा परिणाम म्हणून आपला मृत्यूदर वाढू लागला आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न सध्या भारतात सुरू आहे. त्यासोबतच कोरोनाला मात देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या रक्ताचा वापर करून प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून देखील इतर कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याबाबत प्रयोग सध्या देशात सुरू आहेत. मात्र, असं असलं, तरी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोना दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने किंवा व्यक्तीने केलेली एक चूक देखील महागात पडू शकते. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून अधिकाधिक सतर्कतेने पावले टाकली जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -