घरCORONA UPDATECoronavirus: भारतात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर २०.५७ टक्के

Coronavirus: भारतात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर २०.५७ टक्के

Subscribe

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारताने जाहीर केलेला लॉकडाऊन फायदेशीर ठरत असून मागच्या २८ दिवसांत देशातील १५ जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण समोर आलेला नाही. तर ८० जिल्ह्यात मागच्या १४ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा २०.५७ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, देशभरात सध्या २३,०७७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत तब्बल ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी ४,७४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १७,८१० रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर मागच्या २४ तासांत १,६८४ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार समूहात झाला आहे का? याचा तपास करण्यासाठी जिल्हा आणि राज्यांच्या स्तरावर सामूहिक तपासणी (Surveillance) सुरु केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

तर गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, जे क्षेत्र कंटेनमेंट किंवा हॉटस्पॉटच्या यादीत येत नाहीत, त्या ठिकाणी २० एप्रिल पासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. तसेच गृह मंत्रालयाने काढलेल्या काही चुकीच्या संज्ञामुळे संभ्रम पसरला होता. उद्योगाच्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण मिळाल्यास कंपनीच्या सीईओला शिक्षा होणार किंवा कंपनीला तीन वर्षांसाठी टाळे ठोकले जाणार, अशी अफवा पसरली होती. मात्र गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून १५ एप्रिल रोजी असे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -