घरCORONA UPDATEधक्कादायक! एकाचवेळी आढळले २७ कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा ८३ वर

धक्कादायक! एकाचवेळी आढळले २७ कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा ८३ वर

Subscribe

औरंगाबाद शहरात एकाचवेळी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट होताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात एकाचवेळी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर, दिवसभरात नव्याने ३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह औरंगाबादमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८३ वर गेली आहे.

३० कोरोनाबाधित रुग्ण घाटी रुग्णालयात

औरंगाबाद शहरात आढळलेल्या ३० कोरोनाबाधित रुग्णांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

- Advertisement -

एकाच घरातील ३ महिला कोरोनाबाधित

औरंगाबादमध्ये २५ एप्रिल रोजी आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ८३ वर गेली आहे. तर सध्या या महिलांवर मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत १६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात जिल्हा रुग्णालयातील १४ तर खासगी रुग्णालयातील २ अशा १६ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील ८ पैकी ३ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. औरंगाबाद वगळता इतर ४ जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान ७ जिल्हे लवकरच कोरोनावर मात करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाबाधित शिकाऊ डॉक्टर : सुरगाण्यातील 31 जण क्वारंटाईन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -