घरCORONA UPDATE'कोरोनाने जायचं तिकीट बुक केलेलं नाही, लॉकडाऊन वाढवून काय होणार? - राज...

‘कोरोनाने जायचं तिकीट बुक केलेलं नाही, लॉकडाऊन वाढवून काय होणार? – राज ठाकरे

Subscribe

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी दोन वेळा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र ३ मे नंतर लॉकडाऊन राहणार का? लॉकडाऊन किती काळ पुढे नेणार? लॉकडाऊनमुळे कोरोना काही मरणार नाही. कोरोनाने आपल्यातून जाण्याचं तिकीट बुक केलेलं नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करुन त्यातून किती रिकव्हर होत आहेत, किती मृत्यू होत आहेत. याकडे लक्ष दिले पाहीजे. तसेच लॉकडाऊन कधी काढणार, हे आता लोकांना कळले पाहीजे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी एका खासगी वृत्तावाहिनीशी संवाद साधला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, भारताने आतापर्यंत अनेक साथीचे रोग पाहीले, ज्यात अनेक बळी गेले होते. कोरोनापेक्षाही अधिक लोक रस्ते आणि रेल्वे अपघातात लोक मरतात. कोरोनाने काही आपल्यातून जाण्याची निश्चित तारिख सांगितलेली नाही. त्यामुळे आता कोरोनासोबत आपण काळजी घेऊन लॉकडाऊन उघडण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

ती मागणी तळीरांमासाठी नाही तर महसूलासाठी होती

तसेच आपल्या वाईन्स चालू करण्याच्या मागणीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. “मी वाईन्स चालू करण्याची मागणी केली, ती काही तळीरांमासाठी नाही तर महसूल वाढण्यासाठी केली होती. लॉकडाऊन आधी महाराष्ट्रात काही दारूबंदी नव्हती. मात्र काहींनी माझ्यावर तळीरामांची काळजी असल्याचा आरोप केला. वाईन्स ऐवजी कारखाने सुरु करण्याचा पर्याय का नाही दिला, असे सांगितले. मग कारखाने तरी सुरु करा, असे सांगत राज ठाकरे यांनी राज्याचा महसूल वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -