घरमनोरंजनउत्तर रामायणः लव-कुश यांनी सांगितली श्रीरामांना रामकथा; भावूक झाले लोकं

उत्तर रामायणः लव-कुश यांनी सांगितली श्रीरामांना रामकथा; भावूक झाले लोकं

Subscribe

प्रेक्षकांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असून लव-कुशच्या या सुंदर भजनाचे कौतुक केले आहे. ही रामकथा ऐकून ते भावूक कसे आले हे देखील त्यांनी प्रतिक्रिया देऊन सांगितले

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने संपूर्ण जगाला खिळवून ठेवले. जे काम मोठ-मोठ्या कार्यक्रमांना जमले नाही ते रामानंद सागर यांच्या भव्य प्रस्तुतीने करून दाखवले. लॉकडाऊनच्या दरम्यान पुन्हा प्रसारित करण्यात आलेल्या या मालिकेवर लोकांनी इतके प्रेम केले आहे की टीआरपीच्या बाबतीतही या मालिकेने सर्वांना मागे टाकले. तर सोशल मीडियावरदेखील फक्त रामायणाचीच चर्चा होताना दिसतेय. आता उत्तर रामायणचा तो सुंदर क्षणही आला आहे, ज्याद्वारे लव-कुश हे आपले वडील राम यांच्यासमोर रामकथेतून सीतेच्या व्यथा सांगत आहे.

लव-कुश यांनी सांगितली रामकथा

सोशल मीडियावर सध्या उत्तर रामायणाचा ट्रेंड सुरू आहे . लव-कुशच्या तोंडून ही रामकथा ऐकून लोक भावूक झाले आहेत. यापैकी काही प्रेक्षकांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असून लव-कुशच्या या सुंदर भजनाचे कौतुक केले आहे. ही रामकथा ऐकून ते भावूक कसे आले हे देखील त्यांनी प्रतिक्रिया देऊन सांगितले आहे.

- Advertisement -

यात काही शंका नाही, उत्तर रामायणात दाखवलेली रामकथा केवळ हृदयस्पर्शीच नाही तर लोकांच्या डोळ्यात अश्रू देखील आणते. रामानंद सागरच्या या मालिकेची खास गोष्ट म्हणजे ही मालिका लोकांच्या मनात कायम घर करुन आहे. मालिकेतील प्रत्येक सीन, प्रत्येक गाणं लोकांना विचार करायला भाग पाडते. हे ही तेवढंच खरं आहे.

अशा दिल्या लोकांनी प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने असे ट्विट केले की- अद्भुत, रामानंद सागर यांनी केलेली ही मालिका उत्तम आहे, आता लक्षात आले की, संपूर्ण जगाने पुन्हा या मालिकेच्या पुन्हा प्रसारण करण्याची मागणी का केली… लव कुश या दोघांनी आपल्या आईवर म्हणजेच सीतेवर किती अन्याय झाला आहे, हे उत्तमप्रकारे सांगितले. यामुळे लहानपणी पाहिलेली ही मालिका आता पुन्हा पाहून या दोन जुळ्या मुलांनी माझे बालपण पुन्हा मला आठवण्यास मदत कली.

- Advertisement -


दिवंगत कलाकार इरफान खान यांच्या कबरीवर लावले जाणार रातराणीचे झाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -