घरताज्या घडामोडीधक्कादायक! चंद्रपुरात वाघाच्या बछड्याचीही केली कोरोना चाचणी

धक्कादायक! चंद्रपुरात वाघाच्या बछड्याचीही केली कोरोना चाचणी

Subscribe

चंद्रपुरात एका बछड्याचे कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असून हा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस या कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, या कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ माणसालाच नाहीतर आता प्राण्यांनाही होत असल्याचे समोर येत आहे. याचं पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपुरात वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशातील वाघांसंदर्भातील ही पहिली घटना असावी, असा अंदाज वर्तवला जात असून याकरता वनविभाग आणि वन्यजीव संस्था सदस्यांनी त्याच्यासाठी बचाव अभियान राबवले होते.

३-४ महिन्याचा बछडा

चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाच्या अंतर्गत मुल तालुक्यात सुशी – दाबगाव येथे २४ एप्रिल रोजी ३-४ महिन्याचा वाघाचा बछडा आढळून आला होता. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, स्थानिक एनजीओ, रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांच्या मदतीने या बछड्याला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्जिट ट्रिटमेंट सेंटर येथे हलवण्यात आले. बछड्यावर पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या चमुच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

कोवीड – १९ चाचणीसाठी स्वॅब घेतले

सदर बछड्याचे कोवीड – १९ चाचणीसाठी स्वॅब नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. हा अहवाल काय येतो ते पहावे लागणार आहे? कारण वन्यजीव विश्वात हा साथरोग पसरला आहे का? हे या वाघाच्या रिपोर्टवरुन स्पष्ट होणार आहे.

वाघिणीचा शोध सुरु

सध्या क्षेत्रीय कर्मचारी वाघिणीचा शोध घेत आहेत. या बछड्याच्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी आणि गावकरी यांचे चमू तयार करण्यात आले आहेत. तसेच जंगल परिसरात एकूण २९ कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करुन वाघाचे पगमार्क आणि संयुक्त गस्त करुन मादी वाघीणीचा शोधण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: लाखो लिटर बिअर जातेय नाल्यांमध्ये वाहून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -