घरदेश-विदेशखासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांना मोफत वायफाय सुविधा!

खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांना मोफत वायफाय सुविधा!

Subscribe

खासदारांनी दत्तक घेतलेल्या अडिच लाख ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सुविधा देणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. दत्तक घेतलेल्या अडिच लाख इंटरनेटशी जोडले जावे यासाठी सरकार 'संसद आदर्श ग्राम योजना' राबवत आहे.

ग्रामीण भागांचा विकास व्हावा यासाठी देशातील सर्व खासदारांनी एकूण अडीच लाख गावं दत्तक घेतली आहेत. या अडीच लाख गावांमध्ये मोफत इंटरनेट सुविधा दिली जाणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी लोकसभेत खासदार वीरेंद्र कश्यप यांच्या प्रश्नावर दिली. दत्तक घेतलेल्या सर्व गावांमध्ये ‘संसद आदर्श ग्राम योजने’अंतर्गत मोफत वायफाय सुविधा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात डिजिटल क्रांती व्हावी, घराघरात इंटरनेट सुविधा पोहोचावी आणि संपूर्ण देश डिजिटलमय व्हावा यासाठी सरकार ही योजना राबवत आहे.

सरकारचा २५ हजार हॉटस्पॉट बसवण्याचा प्रस्ताव

मनोज सिन्हा यांनी सांगितले की, ‘भारत सरकारने दूरसंचार योजनेच्या माध्यमातून बीएसएनएलकडून ग्रामीण भागांमध्ये २५ हजार वायफायचे हॉटस्पॉट बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे’. त्याचबरोबर भविष्यात इतर सर्व दूरसंचार एजन्सी आणि प्रायव्हेट टेलिकॉम ऑपरेटर ग्रामीण भागांमध्ये वायफाय सेवा पुरवण्यासाठी व्यस्त असणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ‘संसद आदर्श ग्राम योजने’अंतर्गत ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून २.५ लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचे लक्ष्य आहे. सिन्हा यांच्यानुसार १ डिसेंबर २०१७ पर्यंत डिजिटल व्हिजन प्रोग्रॅमच्या अंतर्गत एक लाख ग्रामपंचायती इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय मार्च २०१९ पर्यंत दीड लाख ग्रामपंचायती इंटरनेटशी जोडल्या जाण्याचा निर्धार सिन्हा यांचा आहे.

- Advertisement -

डाव्या पक्षांच्या राज्यांमध्ये २३५५ टॉवरचा निर्धार

१५ जुलैपर्यंत १ लाख १३ हजार ९१ ग्रामपंचायती हाय स्पीड इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. सिन्हा यांनी पुढे सांगितले की, ‘दूरसंचार विभागाने कट्टर डाव्या विचारसरणीचे पक्ष असणाऱ्या दहा राज्यांमध्ये एक प्रकल्प राबवला आहे’. या प्रकल्पानुसार या राज्यांमध्ये २३५५ टॉवर उभारण्यात येणार आहेत. यापैकी २३३५ टॉवर उभारण्यात आल्याचीही माहिती सिन्हा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -