घरCORONA UPDATEभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या - रोहित पवार

भरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या – रोहित पवार

Subscribe

आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये. असा सल्लाही रोहित पवारांनी तरूणांना दिला.

सरकारने नोकरभरती रद्द केल्याने अनेक युवा उमेदवार पुढच्या वर्षी वयाच्या निकषातून बाद होतील. त्यामुळे वर्षभर किमान वेतनावर सेवेत घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. कोरोनामुळे आलेल्या वित्तीय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा ‘एज बार’ होतील.  त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/ किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी आणि सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

- Advertisement -

लॉकडाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार गावी जाण्यासाठी निघाले आहेत. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा आणि आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये. असा सल्लाही रोहित पवारांनी तरूणांना दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यालाही आर्थिक संकटाने घेरले असून राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर सर्व विभागात नोकरभरती न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच शासकीय खर्चासाठीदेखील ३३ टक्केच निधी मिळणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या खर्चातून ६७ टक्के कमी केले आहेत. तसेच नवीन कोणतीही योजना सादर न करण्याचे आदेश वित्त विभागाने काढले आहेत. शिवाय प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत, त्या निश्चित कराव्यात, असेही यात नमूद केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – CoronaCrisis: यंदा नोकरभरती नाही; राज्य सरकारचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -