घरताज्या घडामोडीCoronaVirus: अमेरिकन लोकांच्या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार - नोम चॉम्स्की

CoronaVirus: अमेरिकन लोकांच्या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार – नोम चॉम्स्की

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात समाजशास्त्रज्ञ नोम चॉस्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप केले आहेत.

जगात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाचे १३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी ८० लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की म्हणाले आहेत. तसंच ते म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या संकटात रक्षक असल्याचे नाटक करत असून ते अमेरिकच्या लोकांच्या पाठीत खंजीर खूपसत आहेत.

ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनला मुलाखत देताना म्हणाले की, अमेरिकेतील हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. निवडणुकीचा फायदा आणि व्यावसायिकांचा खिशा भरण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांचा जीव घेतला आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

- Advertisement -

कोरोना विरोधात लढण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी राज्यांच्या राज्यापालांवर सोपविली असून त्यांनी स्वतःच्या कर्तव्याकडे पाठ फिरवली आहे. तसंच सर्व लोकांना जीवे मारण्याची आणि त्याचे राजकारण सुधारण्याची रणनीती असल्याची टीका नोम चॉम्स्की यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत १३ लाख ७२ हजार ६७१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८० हजार ९३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाख २४ हजार ७२१ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: पुन्हा एकदा WHOने भारताचं केलं कौतुक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -