घरताज्या घडामोडी‘मेरा आंगण....मेरा रणांगण’

‘मेरा आंगण….मेरा रणांगण’

Subscribe

राज्य सरकारविरोधात भाजपचे निषेध आंदोलन

नाशिक : राज्यात वाढत चाललेल्या गंभीर परिस्थीकडे लक्ष वेधण्यासाठीच नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेत भाजपने आपल्या घरासमोरुनच ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे आंदोलन केले. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घरासमोरच निषेधाचे फलक झळकावले. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 41 हजारांवर पोहोचली असून मृतांचा आकडा पंधराशेवर पोहोचला आहे. करोनावर उपाय योजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी (दि.22) महाविकास आघाडीचा निषेध केला. नाशिकमध्ये खासदार डॉ.भारती पवार यांच्या घरासमोर हातात निषेधाचे फलक घेवून पदाधिकार्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
‘मेरा आंगण….मेरा रणांगण’ असे नाव देत भाजपने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. नाशिक शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाजपा नेते सुनील बच्छाव, भाजपा चिटणीस डॉ.उमेश काळे, युवा मोर्च्या प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंद यांनी खासदार डॉ.पवार यांच्या घरासमोर राज्य सरकारचा निषेध केला. सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना भाजप पदाधिकार्र्‍यांना निवेदन दिले. त्यानुसार, येत्या मे महिन्यात महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही राज्य सरकारला याचचे गंभीर्य नाही. लॉकडॉउन फक्त नावाला आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. हॉस्पिटल भरलेले आहेत. रुग्णांना ऍम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून रुग्णांचा रस्त्यात तडफडून जीव जात आहे. तरीही सरकारला याचं गांभीर्य नाही. देशात करोनाच्या एकूण संख्येपैकी 30 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर 24 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तरीही सरकार हातावर हात धरून बसलेल आहे. लॉकडॉउन असताना, लोक रस्त्यावर फिरत आहेत. राज्यात लॉकडॉउनमध्ये गृहसचिव धनदांडग्यांनाच पासची सोय करून हिल स्टेशनला पाठवतात. याबद्दल गृहमंत्र्यांना याची खबर लागत नाही. म्हणजे किती गांभीर्य राज्याच्या गृहमंत्र्यांना आहे यावरून समजते, असा आरोप भाजपने केला आहे.

...भाजपचे आरोप

  1. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने आर्थिक तरतूद करून पॅकेज द्यावे
  2. अनेक संकटे उभी असतांना राज्य सरकार मात्र राजकारणात व्यस्त
  3. एकट्या महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाईल
  4. गृहसचिव धनदांडग्यांना पासची सोय करुन महाबळेश्वरला कसे पाठवतात
  5. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध
  6. साधूसंतांच्या हत्येमुळे कायदा सुव्यवस्था वेशीवर 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -