घरदेश-विदेशCorona: भारतातील ५ कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याची सुविधा नाही!

Corona: भारतातील ५ कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याची सुविधा नाही!

Subscribe

"कोरोनाच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने, बर्‍याच देशात ही सुविधा उपलब्ध नाही."

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. अशा परिस्थितीत हा रोग टाळण्यासाठी सोशल डिस्टेन्सिंग आणि स्वच्छता राखणं एकमेव मार्ग असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील पाच कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याची सुविधा नाही.  दरम्यान, अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील Institute for Health Metrics and Evaluation (IHME) च्या संशोधकांनी असे म्हटले की, १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारतातील ५ कोटीहून अधिक लोकांमध्ये हात धुण्याची साधी योग्य व्यवस्था देखील नाही. त्यामुळे या लोकांना कोरोनाची लागण होण्याचा आणि त्यांच्याद्वारे इतरांमध्ये हा संसर्ग फैलवण्याचा धोका सर्वाधिक आहे, असे संशोधकांनी सांगितले आहे.

संशोधन करताना या संशोधकांना असे आढळले की, कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील दोन अब्जांपेक्षा जास्त लोकांना आपली स्वच्छता राखण्यासाठी साबण आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता नसल्याने श्रीमंत देशांतील लोकांशी तुलना करता या देशातील लोकांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. संशोधकांच्या मते ही संख्या जगातील लोकसंख्येच्या चतुर्थांश आहे.

- Advertisement -

Environmental Health Perspectives यामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, आफ्रिका आणि ओशनियामधील ५० टक्क्यांहून अधिक लोकांना हात धुण्याची योग्य सुविधा नाही. यासंदर्भात आयएचएमईचे प्राध्यापक मायकेल ब्राऊऐर यांनी असे म्हटले, “कोरोनाच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने, बर्‍याच देशात ही सुविधा उपलब्ध नाही.”

तसेच, ४६ देशांमधील निम्म्याहून अधिक लोकांमध्ये साबण आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता नाही. प्रकाशित अहवालानुसार भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया, कांगो, नायजेरिया आणि इंडोनेशियामधील प्रत्येक देशात पाच कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याची सुविधा नाही, असे संशोधनातून समोर आले आहे.


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या वर; ‘या’ देशात वेगानं वाढताय रूग्ण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -