घरट्रेंडिंग#KiKiChallenge सोशल मीडियावरचा नवा बिनडोकपणा!

#KiKiChallenge सोशल मीडियावरचा नवा बिनडोकपणा!

Subscribe

सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला #kikichallenge ट्रेंड जीवघेणा ठरत आहे. या ट्रेंडचे चॅलेंज स्विकारणाऱ्या बऱ्याच तरुणांचे अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर #kikichallenge ही एक नवा ट्रेंड उदयास आलाय. या ट्रेंडच्या हॅशटॅगमार्फत बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होतायत. हे चॅलेंज स्वीकारुन कित्येक तरुण-तरुणी चालत्या गाडीमधून उडी मारून नृत्य करतायत. त्यांचे हे नृत्य गाडीच्या आतमधून कुणीतरी कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतं. व्हिडिओतील तरुणी ज्या गाण्यावर नृत्य करते, ते गाणे ‘इन माय फिलिंग्स’ असे आहे. या गाण्याची निर्मिती कॅनडाचे नामांकित गायक आणि रॅपर ड्रेक यांनी केली आहे. ड्रेक यांनीच हे गाणे गायले आहे. हे गाणे लाँच झाल्यानंतर ऑनलाईन कॉमेडी शिग्गीने या गाण्यावर नृत्य केले. त्यानंतर हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तिने या गाण्यावरील नृत्य सोशल मीडियावर टाकले तेव्हा #kikichallenge असा हॅशटॅगही तिने दिला होता. या हॅशटॅगनंतर जगभरातील तरुणांनी हे चॅलेंज स्विकारले.

चालत्या गाडीतून उतरण्याच्या स्टंटमुळे अपघात

या चॅलेंजमध्ये व्हिडिओ बनवण्याच्या खटाटोपात कित्येक तरुण-तरुणींचे अपघात होतायत. यामुळे कित्येक तरुण-तरुणी व्हिडिओ बनवताना गंभीर जखमी झालेत. काही इन्स्टाग्राम व्हिडिओंमध्ये तरुणी चालत्या गाडीमधून रस्त्यावर उतरुन नृत्य करत असताना बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीची जोरदार टक्कर त्यांना होताना दिसत आहे. या खतरनाक ट्रेंडला रोखण्यासाठी अबू धाबी आणि अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये सरकारकडून या ट्रेंडवर पूर्णपणे बंदी आणली गेलीय.

- Advertisement -

भारतात नोरा फतेहीने सर्वात अगोदर स्वीकारले चॅलेंज

या चॅलेंजला दूजोरा देणाऱ्या हॉलिवूड स्टार विल स्मीथ, कॉमेडीयन शिग्गी आणि गायक ड्रेक यांना विविध भागातील पोलिसांनी लोकांना हे चॅलेंज न स्विकारण्याचे आवाहान करावेस असे सांगितले. आतापर्यंत भारतातील सेलेब्रेटींनी प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने हे चॅलेंज स्विकारले. त्यानंतर देशातील अनेक सेलेब्रीटींनी हे चॅलेंज स्विकारले आहे. दरम्यान, हा ट्रेंड आता देशातही धडकला असला तरीही देशात या ट्रेंडला सध्यातरी बेकायदेशीर घोषित करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

मग देशातही सेलेब्रेटींना या ट्रेंडचे वेड लागले

भारतात नोरा फतेही नंतर अनेक सेलेंब्रेटींनी हे चॅलेंज स्विकारले. त्यात दाक्षिणात्य अभिनेत्रींचा जास्त समावेश आहेत. यामध्ये रेजिना कॅसेन्ड्राचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रविवारी सकाळी तिने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला.


अदाह शर्माचा चॅलेंजमध्ये ८० व्या दशकाचा लूक

बॉलिवूड अभिनेत्री अदाह शर्माने देखील हे चॅलेंज स्विकारले आहे. अदाह शर्माला २०१४ साली फिल्मफेअर पुरस्कारानी सम्मानीत केले आहे. तिने अनेक हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चॅलेंजमध्ये तिने ८०व्या दशकातील प्रचलित लूक परिधान केले आहे.


#kikichallenge विरोधात मुंबई पोलिसांचे ट्विट

दरम्यान मुंबई पोलिसांनी #kikichallenge संबंधित चॅलेंजचे व्हिडिओ न करण्याचे आव्हान केले आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करुन हे आव्हान दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -