घरCORONA UPDATEसोनूने शेअर केला नंबर, कोण म्हणतय गर्लफ्रेंडला भेटायचय तर, कोणी म्हणालं....

सोनूने शेअर केला नंबर, कोण म्हणतय गर्लफ्रेंडला भेटायचय तर, कोणी म्हणालं….

Subscribe

बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. अनेक उपाययोजना करूनही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊनचा ४ था टप्पा देशात सुरू आहे. परंतु या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे. आतापर्यंत सोनू सूदने हजारो प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. सोनू सूदच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनु ने आता मजुरांच्या मदतीसाठी ट्विटरवर नंबर शेअर केला आहे. हा नंबर शेअर करताना सोनू ने लिहिलं आहे की,

- Advertisement -

‘माझ्या प्रिय कामगार बंधूंनो. जर तुम्ही मुंबईत असाल आणि तुम्हाला तुमच्या घरी जायचे असेल तर कृपया या क्रमांकावर- १८००१२१३७११ नंबरवर कॉल करा किंवा ९३२१४७२११८ या व्हॉट्सअॅपवर तुमचे नाव व पत्ता सांगा. मित्रांनो, आम्हाला सांगा की आपण किती लोक आहात आणि आपण आता कुठे आहात. माझी टीम नक्की तुम्हाला मदत करेल.

- Advertisement -

सोनूने केलेल्या ट्विटनंतर सगळ्यांनी त्याचे आभार मानले आहेत. लोकांनी त्याच खूप कौतुक केलं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवे होतात असेही म्हटलं आहे.

गर्लफ्रेंडला भेटायचं आहे

नेटकऱ्याने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बिहारला जायचे आहे. त्यासाठी मदत करण्याची विनंती सोनूकडे केली. या प्रेमवीराला सोनूने देखील गंमतीशीर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “थोडे दिवस तिच्यापासून दूर राहा. खऱ्या प्रेमाची परीक्षा होईल.” सोनू सूदचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन सोनू सूदने काही मजुरांसाठी काही गाड्यांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सोनूने विनामुल्य उपलब्ध करून दिले आहे. ‘शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही’, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. यापूर्वी त्याने आपले हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दिलं आहे. तसंच ५००० पीपीई किट्सची देखील त्याने मदत केली होती.


हे ही वाचा – बिहारमध्ये सोनू सूदचा पुतळा उभारण्याची तयार सुरू; हे समजताच तो म्हणाला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -