घरCORONA UPDATEलालपरीची नामी शक्कल! 'या' साठी एसटीचं रूपांतर होणार ट्रकमध्ये!

लालपरीची नामी शक्कल! ‘या’ साठी एसटीचं रूपांतर होणार ट्रकमध्ये!

Subscribe

ग्रामीण भागातील शेतमाल व इतर व्यापारी वर्गाला वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून एसटी ट्रकची व्यवस्था करण्यात आली.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात एसटीची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटीला कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र काही ठिकाणी काही प्रमाणात  सेवा सुरू करण्यात आली. मात्र हवा तसा नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीने नामी शक्कल लढवली आहे. एसटी महामंडळाने हा तोटा कमी करण्यासाठी “एसटी ट्रक” सुरू करणार आहे.

एसटीचा एसटी ट्रक

ग्रामीण भागातील शेतमाल व इतर व्यापारी वर्गाला वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून एसटी ट्रकची व्यवस्था करण्यात आली. अगदी कमी दरात ही मालवाहतुकीची सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शेतमाल व इतर वाहतुकीला शेतकरी व व्यापारी वर्गाला अडचणी येत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून एसटी महामंडळाच्या दापोडी येथील विभागीय कार्यशाळा कार्यलयात या विशेष ट्रक तयार करण्यात येत आहेत. बसचेच मालवाहतूक ट्रकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. बसमध्ये असलेली बैठक व्यवस्था काढून टाकण्यात येणार आहे.

- Advertisement -

पुढील आठवड्यापर्यंत ही सेवा कार्यरत होईल. या एसटी ट्रकचा शेतकरी व व्यापारी वर्गाला निश्चितच फायदा होईल.  मात्र या मालवाहतुकीचे दर अजून निश्चित करण्यात आले नाहीत. हे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असतील, असं सांगण्यात येत आहे.


हे ही वाचा – TikTok : मुलीचे झाले ४ मिलियन फॉलोअर्स, भाजप नेता केक घेऊन पोहोचला घरी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -