घरताज्या घडामोडीतेलंगणा: बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू!

तेलंगणा: बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू!

Subscribe

तेलंगणामध्ये बुधवारी संध्याकाळी हा चिमुकला खेळताना बोअरवलेमध्ये पडला होता.

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी तीन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. अनेक तासांच्या बचावात्मक कारवाईनंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मेडक जिल्ह्यातील पोड्चना पल्लीगाव येथील ही घटना आहे. या घटनेची माहिती मिळाताच पोलिस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. बुधवारी रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

- Advertisement -

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बोअरवेल खोदण्याचे काम करण्यात आले. १२० ते १५० फूट खोल ही बोअरवेल असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चिमुकल्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था एनडीआरएफकडून करण्यात आली होती. मात्र या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

साधारणा २५ फुटांवर हा चिमुकला अडकला असावा असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी, दोन क्रेन, तीन रुग्णवाहिका दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

- Advertisement -

 

माहितीनुसार, आपल्या आजी-आजोबांकडे हा चिमुकला आला होता. खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट बोअरवेलमध्ये गेला. त्यानंतर कुटुंबाने आपला मुलगा खूप वेळ दिसत नाही म्हणून त्याचा शोध घेतला. त्यावेळेस त्यांना बोअरवेलमधून त्याचा आवाज आला. मग कुटुंबानी तातडीने चिमुकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 


हेही वाचा –  Lockdown: पहिल्यांदा प्रवासी मजुरांनी विमानाने केला प्रवास!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -