घरताज्या घडामोडीमजुरांना परत आणण्यासाठी कंपन्या देतेय फ्लाइटची तिकीट आणि जास्त पगार

मजुरांना परत आणण्यासाठी कंपन्या देतेय फ्लाइटची तिकीट आणि जास्त पगार

Subscribe

देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे अनेक राज्यात अडकलेले मजूर आपल्या घरी परतले. पण यामुळे बांधकामाशी संबंधित असलेल्या कंपन्यांना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत कामगारांना पुन्हा आणण्यासाठी कंपन्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने अनलॉक १.० लागू केल्यानंतर अनेक कामे पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती बऱ्याच बड्या कंपन्या कामगारांना पुन्हा परत आणण्यासाठी फ्लाइटची तिकीट आणि जास्त पैसे देत आहेत. सध्या असलेले प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्यासाठी कंपन्या कामगारांना अशा ऑफर देत आहेत.

हैदराबादमधील एका प्रोजेक्टचे काम करण्यासाठी बेंगळुरू येथील एका बड्या बांधकाम कंपनीच्या कंत्राटदाराने बिहारमधील १० कामगारांच्या विमान तिकिटांची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान काही कंपन्यांना आपल्या कामगारांना घरी जाण्यापासून रोखले असून त्यांची सर्व व्यवस्था केली आहे. जे कामगार आपल्या घरी परत आहेत त्यांना कंपन्या परत आणण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करत आहेत. कामगारांची कमरता असल्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो आणि त्यामुळे कंपनीचे नुकसान होऊ शकते अशी भिती सध्या कंपन्यांना आहे. यामुळे कंपन्या जास्त खर्च करून कामगारांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

रिअल इस्टेट संख्या क्रेडाईच्या तेलंगणा युनिटच्या सदस्याने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान बऱ्याच बड्या बांधकाम कंपन्यांनी स्थलांतरित मजुरांना राहण्याची व्यवस्था आणि जेवण उपलब्ध करून दिले. तसेच त्यांना वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या.

- Advertisement -

तेलंगणाच्या भात गिरण्यांमध्ये काम करणारे ९० टक्के पेक्षा जास्त कामगार बिहारचे होते. होळी दरम्यान ते बिहारला गेले आणि लॉकडाऊनमुळे तिथे अडकले. तेलंगणामध्ये काम करणारे ८.५ लाख मजूर बहुतेक बांधकाम क्षेत्रात काम करतात. एका अंदाजानुसार, हैदराबाद आणि आसपासच्या भागात काम करणारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा येथून येतात.


हेही वाचा – Lockdown: मुंबई विमानतळावर ७४ दिवस अडकला फुटबॉलपटू; आदित्य ठाकरेंनी केली मदत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -