घरताज्या घडामोडी'शिऱ्या.....'ही आबांची हाक पुन्हा ऐकू येणार, टिपरे कुटुंब पुन्हा भेटणार!

‘शिऱ्या…..’ही आबांची हाक पुन्हा ऐकू येणार, टिपरे कुटुंब पुन्हा भेटणार!

Subscribe

या मालिकेने कुटुंब या शब्दाची खरी ओळख प्रेक्षकांना दिली. मालिकेत एक निगेटिव्ह कॅरेक्टर नसताना, कट कारस्थान नसतानाही लोकप्रिय ठरलेली एकमेव मालिका. सासू- सूनांच्या इतर मालिकेत या मालिकेचं स्थानं तेव्हाही एक नंबरवर होतं, आणि आताही आहे.

२००१ साली प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’.  ही मालिका आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. कुटुंबावर आधारित या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने(शलाका) नातीची भूमिका साकारली होती.

गंगाधर टिपरे

ही पात्र जवळपास प्रेक्षकांच्या घरातलीच झाली होती. प्रत्येक तरूण मुलाला शिऱ्या व्हायचं होतं आणि घरातील प्रत्येकालाच आपल्या घरातही असे एख आजोबा असावेत असे वाटत होतं. या मालिकेने कुटुंब या शब्दाची खरी ओळख प्रेक्षकांना दिली. मालिकेत एक निगेटिव्ह कॅरेक्टर नसताना, कट कारस्थान नसतानाही लोकप्रिय ठरलेली एकमेव मालिका. सासू- सूनांच्या इतर मालिकेत या मालिकेचं स्थानं तेव्हाही एक नंबरवर होतं, आणि आताही आहे.

- Advertisement -

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे, मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनी या संग्रहावर तयार केलेली ही मालिका अजरामर ठरली. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा कमी करण्यासाठी हि मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  विनोद हे किती सहज असतात, हे या मालिकेतून समजतं आणि आता त्याच विनोदांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटणार आहे.


हे ही वाचा – अलर्ट! SBI ग्राहकांनो ताबडतोब मोबाईलमधून ‘हे’ अॅप काढून टाका!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -